रेल्वे बजेट: दरवाढीची 'एक्स्प्रेस' ?

रेल्वे बजेट: दरवाढीची 'एक्स्प्रेस' ?

26 फेब्रुवारीकेंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आज आपलं पहिलं रेल्वे बजेट सादर करतील. तब्बल 17 वर्षांनंतर काँग्रेसचे रेल्वेमंत्री आपलं बजेट सादर करणार आहेत. निवडणुकांच्या आधीच्या या बजेटमध्ये नेमकं काय असणार, सामान्यांना काय मिळणार? बजेट 'मंगलमय' असणार आहे का ? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण रेल्वेभाड्यात वाढ होईल अशी शक्यता आहे. डिझेलची दरवाढ झाल्यामुळे उत्पादनातली तूट भरुन काढण्यासाठी ही दरवाढ केली जाणार असल्याची माहिती मिळतेय. या दरवाढीत प्रवासी सुविधांवर अधिभार लावला जाण्याची शक्यता आहे. तर रेल्वेची कामं ही रोजगार हमी योजनेअंतर्गत केली जाणार आहेत. इतकचं नाही तर मुंबई दिल्ली दरम्यान आणखी एक राजधानी एक्स्प्रेस सुरु केली जाणार असल्याचंही कळतंय. रेल्वे बजेट : महाराष्ट्राच्या मागण्या- राज्य सरकारने 50% खर्च उचलण्याची तयारी दाखवलेले पण रेल्वे बोर्डाने मंजुरी न दिलेले प्रकल्प 1) साडे तीनशे किलोमीटरचा मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग, प्रकल्पाची महाराष्ट्रापुरती किंमत आहे 1,278 कोटी रूपये2) नक्षलग्रस्त भागातून जाणारा जवळपास 50 किलोमीटरचा वडसा- देसाईगंज-आरमोरी रेल्वेमार्ग, प्रकल्पाची किंमत आहे 232 कोटी 40 लाख रूपये3) 59 किलोमीटरचा गडचांदूर ते अदिलाबाद रेल्वेमार्ग, प्रकल्पाची किंमत आहे 300 कोटी रूपये4) पुणे-नाशिक रेल्वेमार्ग, प्रकल्पाचा खर्च 1899.64 कोटी रूपये5) जवळपास 11 किलोमीटरचा कराड ते चिपळूण रेल्वेमार्ग, प्रकल्पाचा खर्च 928 6 ) 106 किलोमीटरचा नागपूर-नागभिड रेल्वेमार्ग, एकूण खर्च 376.21 कोटी रूपयेराज्य सरकारनं मागणी केलेले पण रेल्वे बोर्डानं स्थगिती दिलेले प्रकल्प 1) डहाणू-नाशिक रेल्वेमार्ग. 2010-11 पासून हा प्रस्ताव पडून आहे. या प्रकल्पाची अंदाजे किंमत आहे 1813 कोटी 53 लाख रूपये 2) सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग. 1995-96 पासून हा प्रस्ताव पडून आहे3) जालना-खामगाव या 160 किलोमीटरच्या आणि मलकापूर-चिखली या 80 किलोमीटरच्या रेल्वेमार्गांचा प्रस्ताव 1996-97 सालापासून प्रलंबित आहे. 4) कल्याण-माळशेज-अहमदनगर या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव 2006-07 पासून पडून आहे 5) कोल्हापूर-कणकणवली या रेल्वेमार्गाचा प्रस्तावही प्रलंबित आहे 6) अंदाजे 3151 कोटी रुपयांचा सोलापूर-उस्मानाबाद-बीड-जालना-बुलडाणा या रेल्वेमार्गाच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळालेली नाही7) जवळपास याच किमतीचा सोलापूर-उस्मानाबाद-औरंगाबाद-जळगावा या रेल्वेमार्गालाही अजून मंजुरी मिळालेली नाहीसर्व्हे झालेले पण रेल्वे बोर्डाकडून मान्यता न मिळालेले रेल्वे प्रकल्प1) धुळघाट-खांडवा-अकोला-पूर्णा 2) नांदेड-वर्धा-मुसलादेह-हदगाव 3) मालेगाव-सटाणा-साक्री-नवापूर-सूरत4) शिर्डी-शहापूर 5) लोहा-नांदेड-लातूर 6) कोल्हापूर-वैभववाडी रुंदीकरण रखडलेले रेल्वे प्रकल्प1) यवतमाळ-मूर्तिजापूर-अचलपूर या रेल्वेमार्गाचं रुंदीकरण फेब्रुवारी 2009 पासून रखडलंय2) पाचोरा-जामनेर रेल्वेमार्गाचं रुंदीकरण 2002 पासून रखडलंय कोणकोणत्या रेल्वेमार्गांच्या दुहेरीकरणाला सध्या स्थगिती मिळाली आहे 1) पुणे-मिरज-कोल्हापूर या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या प्रस्तावाला 2005साली स्थगिती मिळाली 2) त्याचप्रमाणे दौंड-मनमाड रेल्वेमार्गाचं दुहेरीकरण रेल्वे बोर्डाने मे 2002मध्ये स्थगित केलंय 3) परभणी-मनमाड या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. पण अजून मंजुरी मिळालेली नाही

  • Share this:

26 फेब्रुवारी

केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आज आपलं पहिलं रेल्वे बजेट सादर करतील. तब्बल 17 वर्षांनंतर काँग्रेसचे रेल्वेमंत्री आपलं बजेट सादर करणार आहेत. निवडणुकांच्या आधीच्या या बजेटमध्ये नेमकं काय असणार, सामान्यांना काय मिळणार? बजेट 'मंगलमय' असणार आहे का ? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण रेल्वेभाड्यात वाढ होईल अशी शक्यता आहे. डिझेलची दरवाढ झाल्यामुळे उत्पादनातली तूट भरुन काढण्यासाठी ही दरवाढ केली जाणार असल्याची माहिती मिळतेय. या दरवाढीत प्रवासी सुविधांवर अधिभार लावला जाण्याची शक्यता आहे. तर रेल्वेची कामं ही रोजगार हमी योजनेअंतर्गत केली जाणार आहेत. इतकचं नाही तर मुंबई दिल्ली दरम्यान आणखी एक राजधानी एक्स्प्रेस सुरु केली जाणार असल्याचंही कळतंय.

रेल्वे बजेट : महाराष्ट्राच्या मागण्या

- राज्य सरकारने 50% खर्च उचलण्याची तयारी दाखवलेले पण रेल्वे बोर्डाने मंजुरी न दिलेले प्रकल्प

1) साडे तीनशे किलोमीटरचा मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग, प्रकल्पाची महाराष्ट्रापुरती किंमत आहे 1,278 कोटी रूपये2) नक्षलग्रस्त भागातून जाणारा जवळपास 50 किलोमीटरचा वडसा- देसाईगंज-आरमोरी रेल्वेमार्ग, प्रकल्पाची किंमत आहे 232 कोटी 40 लाख रूपये3) 59 किलोमीटरचा गडचांदूर ते अदिलाबाद रेल्वेमार्ग, प्रकल्पाची किंमत आहे 300 कोटी रूपये4) पुणे-नाशिक रेल्वेमार्ग, प्रकल्पाचा खर्च 1899.64 कोटी रूपये5) जवळपास 11 किलोमीटरचा कराड ते चिपळूण रेल्वेमार्ग, प्रकल्पाचा खर्च 928 6 ) 106 किलोमीटरचा नागपूर-नागभिड रेल्वेमार्ग, एकूण खर्च 376.21 कोटी रूपयेराज्य सरकारनं मागणी केलेले पण रेल्वे बोर्डानं स्थगिती दिलेले प्रकल्प 1) डहाणू-नाशिक रेल्वेमार्ग. 2010-11 पासून हा प्रस्ताव पडून आहे. या प्रकल्पाची अंदाजे किंमत आहे 1813 कोटी 53 लाख रूपये 2) सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग. 1995-96 पासून हा प्रस्ताव पडून आहे3) जालना-खामगाव या 160 किलोमीटरच्या आणि मलकापूर-चिखली या 80 किलोमीटरच्या रेल्वेमार्गांचा प्रस्ताव 1996-97 सालापासून प्रलंबित आहे. 4) कल्याण-माळशेज-अहमदनगर या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव 2006-07 पासून पडून आहे 5) कोल्हापूर-कणकणवली या रेल्वेमार्गाचा प्रस्तावही प्रलंबित आहे 6) अंदाजे 3151 कोटी रुपयांचा सोलापूर-उस्मानाबाद-बीड-जालना-बुलडाणा या रेल्वेमार्गाच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळालेली नाही7) जवळपास याच किमतीचा सोलापूर-उस्मानाबाद-औरंगाबाद-जळगावा या रेल्वेमार्गालाही अजून मंजुरी मिळालेली नाही

सर्व्हे झालेले पण रेल्वे बोर्डाकडून मान्यता न मिळालेले रेल्वे प्रकल्प

1) धुळघाट-खांडवा-अकोला-पूर्णा 2) नांदेड-वर्धा-मुसलादेह-हदगाव 3) मालेगाव-सटाणा-साक्री-नवापूर-सूरत4) शिर्डी-शहापूर 5) लोहा-नांदेड-लातूर 6) कोल्हापूर-वैभववाडी

रुंदीकरण रखडलेले रेल्वे प्रकल्प1) यवतमाळ-मूर्तिजापूर-अचलपूर या रेल्वेमार्गाचं रुंदीकरण फेब्रुवारी 2009 पासून रखडलंय2) पाचोरा-जामनेर रेल्वेमार्गाचं रुंदीकरण 2002 पासून रखडलंय

कोणकोणत्या रेल्वेमार्गांच्या दुहेरीकरणाला सध्या स्थगिती मिळाली आहे 1) पुणे-मिरज-कोल्हापूर या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या प्रस्तावाला 2005साली स्थगिती मिळाली 2) त्याचप्रमाणे दौंड-मनमाड रेल्वेमार्गाचं दुहेरीकरण रेल्वे बोर्डाने मे 2002मध्ये स्थगित केलंय 3) परभणी-मनमाड या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. पण अजून मंजुरी मिळालेली नाही

First published: February 25, 2013, 4:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading