झीनत अमान पुन्हा विवाहबद्ध होणार

झीनत अमान पुन्हा विवाहबद्ध होणार

05 फेब्रुवारी90 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री झीनत अमान आता पुन्हा विवाहबद्ध होणार आहे. 61 वर्षाची झीनत आता कुणाशी लग्न करणार हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. हरे राम हरे कृष्णा, यादों की बारात, सत्यम शिवम सुंदरम,डॉन अशा अनेक सिनेमांतली ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून झळकलेली झीनत अमान यांचं अभिनेता मझहर खान यांच्याशी 1985 साली लग्न झालं होतं. परंतु 1998 साली मझहर यांच्या निधनानंतर झिनत यांनी पुन्हा लग्न करण्याचा विचार साडून दिला होता. पण आता आपल्या आयुष्यात एक भारतीय व्यक्ती असून आम्ही दोघंही लग्नाच्या विचारात आहोत. या संदर्भात झीनतनं अजान आणि झहान या तिच्या दोन्ही मुलांशी चर्चा केली आहे. त्यामुळे वयाच्या 61 व्या वर्षी झीनत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

  • Share this:

05 फेब्रुवारी

90 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री झीनत अमान आता पुन्हा विवाहबद्ध होणार आहे. 61 वर्षाची झीनत आता कुणाशी लग्न करणार हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. हरे राम हरे कृष्णा, यादों की बारात, सत्यम शिवम सुंदरम,डॉन अशा अनेक सिनेमांतली ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून झळकलेली झीनत अमान यांचं अभिनेता मझहर खान यांच्याशी 1985 साली लग्न झालं होतं. परंतु 1998 साली मझहर यांच्या निधनानंतर झिनत यांनी पुन्हा लग्न करण्याचा विचार साडून दिला होता. पण आता आपल्या आयुष्यात एक भारतीय व्यक्ती असून आम्ही दोघंही लग्नाच्या विचारात आहोत. या संदर्भात झीनतनं अजान आणि झहान या तिच्या दोन्ही मुलांशी चर्चा केली आहे. त्यामुळे वयाच्या 61 व्या वर्षी झीनत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

Tags:
First Published: Feb 5, 2013 11:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading