पंतप्रधानपदासाठी संघाचा मोदींना पाठिंबा ?

पंतप्रधानपदासाठी संघाचा मोदींना पाठिंबा ?

07 फेब्रुवारीगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना संघाचाही पाठिंबा मिळाला आहे. कुंभमेळ्यात विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसंसदेत अनेक साधुसंतांनी मोदींच्या नावाच्या घोषणा दिल्या. विशेष म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करावं, असा सूचक सल्ला दिला.गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतीच दिल्लीमध्ये कॉलेज तरूणांशी संवाद साधला आणि ब्रँड गुजरातचं प्रमोशन केलं. तर तिकडे कुंभमेळ्यात विश्व हिंदू परिषदेच्या धर्म संसदेमध्येही मोदींना मोठा पाठिंबा दिसला. या धर्मसंसदेत पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी मोदींच्या नावाची घोषणा मात्र करण्यात आली नाही. पण तरी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदींचं नाव न घेता त्यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. धर्म संसदेत राम मंदिर आणि हिंदू दहशतवाद या मुद्द्यांवर चर्चा झाली. या संसदेत वेगळ्या विषयांवर चर्चा होत असली तरी यावेळी या धर्मसंसदेत राजकीय रंगही चढला. विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांच्या गटानं नरेंद्र मोदींची पुन्हा एकदा प्रशंसा केलीय. भाजपमध्येही मोदींच्या समर्थकांचा आवाज बुलंद होतंय. पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांनी खास पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांनी या विषयावर जाहीर भाष्य न करण्याची समज दिली. विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपतला गट मोदींच्या पाठीशी आहे, हे स्पष्ट झाले ाहे. या पाठिंब्याच्या बळावर मोदींची पुढची वाटचाल सुकर होते का, हे येणार्‍या काळात स्पष्ट होईल.

  • Share this:

07 फेब्रुवारी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना संघाचाही पाठिंबा मिळाला आहे. कुंभमेळ्यात विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसंसदेत अनेक साधुसंतांनी मोदींच्या नावाच्या घोषणा दिल्या. विशेष म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करावं, असा सूचक सल्ला दिला.

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतीच दिल्लीमध्ये कॉलेज तरूणांशी संवाद साधला आणि ब्रँड गुजरातचं प्रमोशन केलं. तर तिकडे कुंभमेळ्यात विश्व हिंदू परिषदेच्या धर्म संसदेमध्येही मोदींना मोठा पाठिंबा दिसला. या धर्मसंसदेत पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी मोदींच्या नावाची घोषणा मात्र करण्यात आली नाही. पण तरी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदींचं नाव न घेता त्यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला.

धर्म संसदेत राम मंदिर आणि हिंदू दहशतवाद या मुद्द्यांवर चर्चा झाली. या संसदेत वेगळ्या विषयांवर चर्चा होत असली तरी यावेळी या धर्मसंसदेत राजकीय रंगही चढला. विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांच्या गटानं नरेंद्र मोदींची पुन्हा एकदा प्रशंसा केलीय.

भाजपमध्येही मोदींच्या समर्थकांचा आवाज बुलंद होतंय. पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांनी खास पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांनी या विषयावर जाहीर भाष्य न करण्याची समज दिली. विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपतला गट मोदींच्या पाठीशी आहे, हे स्पष्ट झाले ाहे. या पाठिंब्याच्या बळावर मोदींची पुढची वाटचाल सुकर होते का, हे येणार्‍या काळात स्पष्ट होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2013 01:48 PM IST

ताज्या बातम्या