अपघात वार, वेगवेगळ्या अपघातात 12 ठार

अपघात वार, वेगवेगळ्या अपघातात 12 ठार

04 मार्चआजचा दिवस अपघातांचा दिवस ठरलाय. मुंबईत मानखुर्द, नवी मुंबईत कळंबोली आणि धुळे इथं आज सकाळी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये एकूण 12 जणांचा मृत्यू झाला. मानखुर्द इथं फ्लायओव्हरवरून गॅस टँकर खाली कोसळल्यानंतर त्याला आग लागली. तब्बल सहा तासांनंतर ही आग आटोक्यात आली. पण या घटनेत एकाचा मृत्यू झालाय, तर 15 जण जखमी झाले. त्यातील 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर आगीमुळे जवळपास 33 पक्षी आणि प्राण्यांचा मृत्यू झाला. तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघाताने थरकाप उडाला. सातार्‍याहून ठाण्याला निघालेली एक सुमो कंळबोलीजवळ ट्रेलरवर आदळल्यानं सुमोमधील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. सुमोच्या ड्रायव्हरला झोप लागल्यानं हा अपघात झाल्याचं समजतंय. तर तिकडे धुळ्यात एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे तीन सर्पमित्रांचा मृत्यू झाला आहे. हे तिघं एकाच बाईकवरुन निघाले होते. रविवारी हे तिघेही धुळ्यापासूनजवळ साप पकडण्यासाठी बाइकवरून गेले होते. परत असतांना भरधाव वेगात आलेले अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात तिघांचा मृत्यू झाला.

  • Share this:

04 मार्च

आजचा दिवस अपघातांचा दिवस ठरलाय. मुंबईत मानखुर्द, नवी मुंबईत कळंबोली आणि धुळे इथं आज सकाळी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये एकूण 12 जणांचा मृत्यू झाला. मानखुर्द इथं फ्लायओव्हरवरून गॅस टँकर खाली कोसळल्यानंतर त्याला आग लागली. तब्बल सहा तासांनंतर ही आग आटोक्यात आली. पण या घटनेत एकाचा मृत्यू झालाय, तर 15 जण जखमी झाले. त्यातील 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर आगीमुळे जवळपास 33 पक्षी आणि प्राण्यांचा मृत्यू झाला. तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघाताने थरकाप उडाला. सातार्‍याहून ठाण्याला निघालेली एक सुमो कंळबोलीजवळ ट्रेलरवर आदळल्यानं सुमोमधील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. सुमोच्या ड्रायव्हरला झोप लागल्यानं हा अपघात झाल्याचं समजतंय. तर तिकडे धुळ्यात एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे तीन सर्पमित्रांचा मृत्यू झाला आहे. हे तिघं एकाच बाईकवरुन निघाले होते. रविवारी हे तिघेही धुळ्यापासूनजवळ साप पकडण्यासाठी बाइकवरून गेले होते. परत असतांना भरधाव वेगात आलेले अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात तिघांचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2013 09:22 AM IST

ताज्या बातम्या