राहुल गांधी होणार कार्याध्यक्ष ?

राहुल गांधी होणार कार्याध्यक्ष ?

19 जुलैकाँग्रेसचे युवराज राहुल गांधी कार्याध्यक्ष होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी आयबीएन नेटवर्कला दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरमध्ये याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. पक्ष आणि सरकारमध्ये मोठी जबाबदारी घ्यायला आपण तयार असल्याचं राहुल गांधींनी आज स्पष्ट केलं होतं. पण याबाबत अंतिम निर्णय सोनिया गांधींनी घ्यावा असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. त्यामुळे सोनिया गांधी त्यांना पक्षाच्या कार्याध्यपदाची जबाबदारी देतील असं समजतंय. विशेष म्हणजे प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदासाठी मैदानात उतरल्यानंतर काँग्रेसमध्ये सक्षम आणि मोठ्या नेत्याची जागा रिकामी झालीय. त्यामुळे राहुल गांधींसाठी ही एक प्रकारे नवी सुरुवात असल्याची शक्यता आहे. 2014 च्या निवडणुका लक्षात घेता दिग्विजय सिंग आणि सलमान खुर्शीद यांनी या अगोदरच राहुल गांधींना मोठी जबाबदारी द्यावी आणि राहुल यांनी पक्षाला चांगली दिशा द्यावी अशी अपेक्षा बोलून दाखवली होती. पण खुर्शीदांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला होता त्यानंतर त्यांना तसा खुलासाही द्यावा लागला. आज राहुल यांनी मोठी जबाबदारी घेण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे आता राहुल गांधींची नवी 'इनिंग' सुरु होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

19 जुलै

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी कार्याध्यक्ष होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी आयबीएन नेटवर्कला दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरमध्ये याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. पक्ष आणि सरकारमध्ये मोठी जबाबदारी घ्यायला आपण तयार असल्याचं राहुल गांधींनी आज स्पष्ट केलं होतं. पण याबाबत अंतिम निर्णय सोनिया गांधींनी घ्यावा असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. त्यामुळे सोनिया गांधी त्यांना पक्षाच्या कार्याध्यपदाची जबाबदारी देतील असं समजतंय.

विशेष म्हणजे प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदासाठी मैदानात उतरल्यानंतर काँग्रेसमध्ये सक्षम आणि मोठ्या नेत्याची जागा रिकामी झालीय. त्यामुळे राहुल गांधींसाठी ही एक प्रकारे नवी सुरुवात असल्याची शक्यता आहे. 2014 च्या निवडणुका लक्षात घेता दिग्विजय सिंग आणि सलमान खुर्शीद यांनी या अगोदरच राहुल गांधींना मोठी जबाबदारी द्यावी आणि राहुल यांनी पक्षाला चांगली दिशा द्यावी अशी अपेक्षा बोलून दाखवली होती. पण खुर्शीदांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला होता त्यानंतर त्यांना तसा खुलासाही द्यावा लागला. आज राहुल यांनी मोठी जबाबदारी घेण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे आता राहुल गांधींची नवी 'इनिंग' सुरु होण्याची शक्यता आहे.

First published: July 19, 2012, 12:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या