IBN लोकमत इम्पॅक्ट : वसतीगृहातला वीजपुरवढा पुन्हा सुरळीत

02 फेब्रुवारीनंदुरबार जिल्ह्यातल्या खांडबारा या आदिवासी वसतीगृहातला खंडीत केलेला वीजपुरवठा पुन्हा सुरळीत झाला आहे. ऐन बारावीच्या परीक्षेदरम्यानच वीज आणि पाणी बंद केल्यानं विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. ही बातमी आयबीएन लोकमतनं लावून धरल्यानंतर आदिवासी विकास मंत्र्यांनी त्याची दखल घेतली आहे. तातडीने आदिवासी विकास विभागानं वसतीगृहाचं थकलेलं बील भरलं आहे. या जिल्ह्यातील एकूण 3 वसतीगृहात वीज बिल थकल्यामुळे अंधार पसरला होता. गेल्या तीन दिवसांपासून या वसतीगृहाची वीज कापण्यात आली होती. या वसतीगृहात बारावीचे 50 विद्यार्थी आहेत. वीज कापल्यामुळे पाण्याचे पंपही बंद होते. त्यामुळे ऐन परीक्षेच्या दिवसांत विद्यार्थ्यांचे वीज आणि पाण्यावाचून हाल झाले. विशेष म्हणजे वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज गेल्याची ही पहिलीच घटना नाही. नंदुरबारमधल्या बर्‍याच आश्रमशाळांमध्ये आणि वस्तीगृहांमध्ये बिलं न भरल्यानं अंधार आहे. काही दिवसांपूर्वी गुरुकूल नगरमधल्या वस्तीगृहातही अशीच वीज कापण्यात आली होती. आदिवासी विकास मंत्र्यांनी मध्यस्थी केल्यावर वीज कनेक्शन जोडून देण्यात आलं.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Mar 2, 2013 10:11 AM IST

IBN लोकमत इम्पॅक्ट : वसतीगृहातला वीजपुरवढा पुन्हा सुरळीत

02 फेब्रुवारी

नंदुरबार जिल्ह्यातल्या खांडबारा या आदिवासी वसतीगृहातला खंडीत केलेला वीजपुरवठा पुन्हा सुरळीत झाला आहे. ऐन बारावीच्या परीक्षेदरम्यानच वीज आणि पाणी बंद केल्यानं विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. ही बातमी आयबीएन लोकमतनं लावून धरल्यानंतर आदिवासी विकास मंत्र्यांनी त्याची दखल घेतली आहे. तातडीने आदिवासी विकास विभागानं वसतीगृहाचं थकलेलं बील भरलं आहे. या जिल्ह्यातील एकूण 3 वसतीगृहात वीज बिल थकल्यामुळे अंधार पसरला होता. गेल्या तीन दिवसांपासून या वसतीगृहाची वीज कापण्यात आली होती. या वसतीगृहात बारावीचे 50 विद्यार्थी आहेत. वीज कापल्यामुळे पाण्याचे पंपही बंद होते. त्यामुळे ऐन परीक्षेच्या दिवसांत विद्यार्थ्यांचे वीज आणि पाण्यावाचून हाल झाले. विशेष म्हणजे वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज गेल्याची ही पहिलीच घटना नाही. नंदुरबारमधल्या बर्‍याच आश्रमशाळांमध्ये आणि वस्तीगृहांमध्ये बिलं न भरल्यानं अंधार आहे. काही दिवसांपूर्वी गुरुकूल नगरमधल्या वस्तीगृहातही अशीच वीज कापण्यात आली होती. आदिवासी विकास मंत्र्यांनी मध्यस्थी केल्यावर वीज कनेक्शन जोडून देण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2013 10:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...