या पाकिस्तानी खेळाडूने तोडला नियम; पत्नीला कपाटात लपवून खेळला वर्ल्ड कप

या पाकिस्तानी खेळाडूने तोडला नियम; पत्नीला कपाटात लपवून खेळला वर्ल्ड कप

या पाकिस्तानी खेळाडूने हा धक्कादायक खुलासा केला आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 1 जुलै : भारत-पाकिस्तान आणि बांग्लादेशचे क्रिकेट बोर्ड विश्वचषक स्पर्धेदरम्यान खेळाडूंना कुटुंबापासून दूर ठेवतात. खेळाडूंनी केवळ क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे हे त्यामागील उद्दीष्ट आहे. क्रिकेट बोर्डाच्या या नियमांचे खेळाडूही पालन करतात.

पण एका दिग्गज पाकिस्तानी खेळाडूने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने विश्वचषक स्पर्धेदरम्यान पीसीबीची परवानगी न घेता पत्नीला स्पर्धेदरम्यान आपल्यासोबत ठेवले होते. त्याने पत्नीला कपाटात लपवून ठेवल्याचा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे.

हे वाचा-कोरोनामुळे भारतीय क्रिकेटरच्या वडिलांचा मृत्यू; सेहवागने मागितली होती मदत

सकलेन मुश्ताकने केलं उघड

पाकिस्तानचा माजी ऑफस्पिनर सकलेन मुश्ताक याने 1999 विश्वचषकात पत्नीला कपाटात लपवून ठेवल्याचा खुलासा केला आहे. सकलेन यांने यूट्यूबवर रौनक कपूरला सांगितले की, इंग्लंडमध्ये 1999 च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान पीसीबीने अचानक खेळाडूंच्या पत्नी त्यांच्यापासून वेगळे राहावेत असा आदेश दिला होता. सकलेन म्हणाला, 'माझं लग्न डिसेंबर 1998 मध्ये झालं होतं. माझी पत्नी लंडनमध्ये राहायची आणि मी दिवसा सराव करत असे आणि संध्याकाळी पत्नीसमवेत वेळ घालवत असे. पण अचानक पीसीबीने कुटुंबीयांना परत पाठविण्याचा आदेश दिला आणि मी ठरवलं की मी हा नियम पाळणार नाही.

हे वाचा-वडिलांना वाटलं की मुलगा शिपाई होईल; मात्र त्याने टीम इंडियामध्ये मिळवले स्थान

सकलेन म्हणाला की त्याने पीसीबी अधिकारी आणि खेळाडूंच्या नजरेतून आपली पत्नी लपविली आणि जेव्हा कोणी त्याच्या खोलीत आलं तर तो पत्नीला कपाटात लपवत असे. सकलेन म्हणाला, 'टीम मॅनेजर आणि प्रशिक्षक आमच्या रूममध्ये तपासणीसाठी येत असत. खेळाडूही येत असत. एक दिवस माझ्या खोलीचा दरवाजा वाजला आणि मी पत्नीला कपाटात लपवून ठेवले. यानंतर, मोहम्मद युसूफ आणि अझर मेहमूद माझ्या खोलीत आले आणि मी माझ्या पत्नीला पुन्हा कपाटात लपण्यास सांगितले.

 

संपादन - मीनल गांगुर्डे

 

First published: July 1, 2020, 7:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading