निर्दयीपणाचा कळस, एक दिवसाच्या अर्भकाला रस्त्याच्या कडेला फेकलं

निर्दयीपणाचा कळस, एक दिवसाच्या अर्भकाला रस्त्याच्या कडेला फेकलं

एक दिवसाच्या बाळाला पिशवीमध्ये घालून रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • Share this:

बीड, 12 एप्रिल : बीडमध्ये काळजाला चर्र करणारा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एक दिवसाच्या बाळाला पिशवीमध्ये घालून रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नुकत्याच जन्मलेल्या बळाचा काय गुन्हा असाच एकच सवाल आता सर्व स्तरातून विचारण्यात येत आहे.

बीड तालुक्यातील येळंबघाटजवळ केज रोडवरील मंगल कार्यालयाशेजारी रस्त्याच्या कडेला अवघ्या एका दिवसाच्या नवजात (पुरुष )अर्भकाला पिशवीत घालून रस्त्यावर टाकून देण्यात आलं होतं. या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निष्पाप अर्भकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून बाळाची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

रस्त्याच्या कडेला बाळाचा आवाज येत असल्याचं काही लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यानी पाहिलं तर पिशवीत लहान मुल आढळलं. ग्रामस्थांनी याची माहिती नेकनूर पोलिसांना दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे अर्भकाच्या डोळ्याला इजा झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळावरून अर्भकाला ताब्यात घेतलं आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण या बाळाला अशा पद्धतीने सोडून जाणाऱ्या पालकांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे पोलीस आता या घटनेची कसून चौकशी करत आहेत.

या प्रकरणाची आणखी माहीती मिळवण्यासाठी पोलीस प्रथमदर्शनींची चौकशी करणार आहेत. तर बाळाला असं पिशवीत कोणी सोडलं याची माहीती मिळवण्यासाठी आता परिसरातील सीसीटीव्ही तपासले जाणार आहेत.

दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर आपला देश खरंच पुढारलेल्या विचारांचा आहे का? असाही सवाल या घटनेवरून उपस्थित होतो.

VIDEO : जेव्हा भरसभेत शरद पवार खरीखुरी बॅटिंग करतात...

 

First published: April 12, 2019, 5:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading