तहव्वुर राणाला 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा

तहव्वुर राणाला 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा

18 जानेवारीमुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी तहव्वुर राणाला 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. तसंच या शिक्षेनंतर 5 वर्ष तहव्वुर राणाने आपलं जीवन पोलिसांच्या नजरेखाली घालवावं अशी सुचना शिकागोच्या न्यायालयाने केली आहे. तहव्वुर राणावर लष्कर-ए-तोयबाला साहित्य पुरवल्याबद्दल आणि डेन्मार्क मधील वृत्तपत्रावर हल्ला करण्याच्या कटात सहभागी झाल्याबद्दल शिकागो कोर्टाने ही शिक्षा दिली आहे. दरम्यान, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पाकिस्तानने मुंबई हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे.

  • Share this:

18 जानेवारी

मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी तहव्वुर राणाला 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. तसंच या शिक्षेनंतर 5 वर्ष तहव्वुर राणाने आपलं जीवन पोलिसांच्या नजरेखाली घालवावं अशी सुचना शिकागोच्या न्यायालयाने केली आहे. तहव्वुर राणावर लष्कर-ए-तोयबाला साहित्य पुरवल्याबद्दल आणि डेन्मार्क मधील वृत्तपत्रावर हल्ला करण्याच्या कटात सहभागी झाल्याबद्दल शिकागो कोर्टाने ही शिक्षा दिली आहे. दरम्यान, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पाकिस्तानने मुंबई हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2013 12:57 PM IST

ताज्या बातम्या