मोदींची नगरमधील सभा : काळे कपडे घालून जाण्यास मनाई, बनियानही काढण्यास सांगितलं

मोदींची नगरमधील सभा : काळे कपडे घालून जाण्यास मनाई, बनियानही काढण्यास सांगितलं

युतीचे उमेदवार डॅा. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी इथं सभा घेणार आहेत.

  • Share this:

अहमदनगर, 12 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज शुक्रवारी(12 एप्रिल) अहमदनगरला जाहीर सभा होत आहे. या सभेत काळे कपडे घालून आलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यात आला नाही. तसंच सभेसाठी आलेल्या काही लोकांना काळ्या रंगाचं बनियान घातलं असल्यास ते उरवण्यास सांगितलं जात आहे. याबाबत 'आज तक'ने वृत्त दिलं आहे.

युतीचे उमेदवार डॅा. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी इथं सभा घेणार आहेत. पण या सभेवेळी काळ्या रंगाचं कापड अंगावर असल्या कारणाने अनेक लोकांना प्रवेश दिला जात नसल्याचं समोर आलं आहे.

नगरमध्ये भाजप Vsराष्ट्रवादी

सुजय पाटलांनी थेट भाजपचाच झेंडा हातात घेत अहमदनगर मतदारसंघात थेट राष्ट्रवादीला आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीनेही ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संग्राम जगताप यांना नगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे यांच्याविरोधात आता नगरमधून राष्ट्रवादीने तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे आता नगरची लोकसभा निवडणूक मोठी रंगतदार असणार आहे.

SPECIAL REPORT : मुलगा की पक्ष? विखेंनी निवडला हा मार्ग!

First published: April 12, 2019, 11:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading