'बाळासाहेबांचं नाव दिलं नाही तर संमेलन उधळून लावू'

'बाळासाहेबांचं नाव दिलं नाही तर संमेलन उधळून लावू'

08 जानेवारीचिपळूण येथे होणार्‍या साहित्य संमेलनाचा वाद थांबता थांबेना. आता या वादात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध करणं हा संकुचितपणा आहे. जर बाळासाहेबांचे नाव व्यासपीठाला दिले नाही तर संमेलन उधळून लावू असा थेट इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.साहित्यकांना 'बैल', 'झक मारली आणि पु.लं.ना पुरस्कार दिला', 'मोडका पु.लं' अशी टीका बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्यकांवर केली होती. याच टीकेमुळे दुखावलेल्या साहित्यकांनी बाळासाहेबांच्या नावाला विरोध केलाय. चिपळूण येथे 86 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची घोषणा बाळासाहेबांच्या निधनानंतर झाली होती. आता संमेलन काही दिवसांवर येऊन ठेपले असतात. एका-एका वादला फाटे फुटले आहेत. पुष्पा भावे आणि अन्य साहित्यिकांनी बाळासाहेबांच्या नावाला विरोध केलाय. साहित्यकांचा विरोध मोडीत काढण्यासाठी शिवसेनेनंही आपल्या स्टाईलने उत्तर दिलं. आता या वादात शिवसेनेचा मित्रपक्ष रिपाइंने उडी घेतली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा साहित्यकांशी जवळचा संबंध होता. संमेलन समितीचा बाळासाहेबांचं नाव देण्याचं ठरवलं. तरी सुद्धा साहित्यकांच्या आग्रहामुळे जर बाळासाहेबांचे नाव दिले जात नसेल तर संमेलन उधळून लावू असा इशारा रामदास आठवले यांनी दिलाय. संमेलनावरून वाद घालू नये. बाळासाहेबांशी कोणाचे वैचारिक मतभेद असू शकतात पण साहेबांनी महाराष्ट्रासाठी खूप काही दिलं आहे याची दखल सर्वांनी घ्यावी असा सल्लाही आठवले यांनी दिला.

  • Share this:

08 जानेवारी

चिपळूण येथे होणार्‍या साहित्य संमेलनाचा वाद थांबता थांबेना. आता या वादात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध करणं हा संकुचितपणा आहे. जर बाळासाहेबांचे नाव व्यासपीठाला दिले नाही तर संमेलन उधळून लावू असा थेट इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.

साहित्यकांना 'बैल', 'झक मारली आणि पु.लं.ना पुरस्कार दिला', 'मोडका पु.लं' अशी टीका बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्यकांवर केली होती. याच टीकेमुळे दुखावलेल्या साहित्यकांनी बाळासाहेबांच्या नावाला विरोध केलाय. चिपळूण येथे 86 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची घोषणा बाळासाहेबांच्या निधनानंतर झाली होती. आता संमेलन काही दिवसांवर येऊन ठेपले असतात. एका-एका वादला फाटे फुटले आहेत. पुष्पा भावे आणि अन्य साहित्यिकांनी बाळासाहेबांच्या नावाला विरोध केलाय. साहित्यकांचा विरोध मोडीत काढण्यासाठी शिवसेनेनंही आपल्या स्टाईलने उत्तर दिलं. आता या वादात शिवसेनेचा मित्रपक्ष रिपाइंने उडी घेतली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा साहित्यकांशी जवळचा संबंध होता. संमेलन समितीचा बाळासाहेबांचं नाव देण्याचं ठरवलं. तरी सुद्धा साहित्यकांच्या आग्रहामुळे जर बाळासाहेबांचे नाव दिले जात नसेल तर संमेलन उधळून लावू असा इशारा रामदास आठवले यांनी दिलाय. संमेलनावरून वाद घालू नये. बाळासाहेबांशी कोणाचे वैचारिक मतभेद असू शकतात पण साहेबांनी महाराष्ट्रासाठी खूप काही दिलं आहे याची दखल सर्वांनी घ्यावी असा सल्लाही आठवले यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2013 10:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading