प्राध्यापकांचा 12 च्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

प्राध्यापकांचा 12 च्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

21 जानेवारीआपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील ज्युनिअर कॉलेजेचे शिक्षक आज राज्यभर आंदोलन करत आहे. राज्यातील ज्युनिअर कॉलेजच्या 60 हजार प्राध्यापकांनी 12 वीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. 12 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनात शिक्षण मंत्र्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं होतं. पण सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ ज्युनिअर कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेननं घेतलाय. शिक्षकांच्या मागण्यांसाठी आज दुपारी वाशी शिक्षण मंडळावर मोर्चा काढण्यात येतोय. तसंच पुणे, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, औरंगाबाद आणि नागपूरमध्ये मोर्चा निघणार आहेत. प्राध्यापकांच्या मागण्या काय आहेत ?- त्रिस्तरीय वेतनश्रेणी 1996 पासून लागू करा - 6 व्या वेतन आयोगानुसार सुधारित मानधन मंजूर करा - मेडिकल प्रवेशासाठी यावर्षाऐवजी 2014 पासून 'नीट'घ्यावी- मेडिकलसाठी यावर्षी राज्यस्तरीय CET घ्यावी - सायन्स पेपर 1, 2 ची विभागणी करावी - सायन्सच्या प्रॅक्टिकलसाठी बाह्यपरीक्षक नेमण्याची बंद केलेली पद्धत सुरू करावी - कनिष्ठ महाविद्यालयांचं प्रशासन स्वतंत्र करा

  • Share this:

21 जानेवारी

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील ज्युनिअर कॉलेजेचे शिक्षक आज राज्यभर आंदोलन करत आहे. राज्यातील ज्युनिअर कॉलेजच्या 60 हजार प्राध्यापकांनी 12 वीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. 12 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनात शिक्षण मंत्र्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं होतं. पण सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ ज्युनिअर कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेननं घेतलाय. शिक्षकांच्या मागण्यांसाठी आज दुपारी वाशी शिक्षण मंडळावर मोर्चा काढण्यात येतोय. तसंच पुणे, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, औरंगाबाद आणि नागपूरमध्ये मोर्चा निघणार आहेत.

प्राध्यापकांच्या मागण्या काय आहेत ?- त्रिस्तरीय वेतनश्रेणी 1996 पासून लागू करा - 6 व्या वेतन आयोगानुसार सुधारित मानधन मंजूर करा - मेडिकल प्रवेशासाठी यावर्षाऐवजी 2014 पासून 'नीट'घ्यावी- मेडिकलसाठी यावर्षी राज्यस्तरीय CET घ्यावी - सायन्स पेपर 1, 2 ची विभागणी करावी - सायन्सच्या प्रॅक्टिकलसाठी बाह्यपरीक्षक नेमण्याची बंद केलेली पद्धत सुरू करावी - कनिष्ठ महाविद्यालयांचं प्रशासन स्वतंत्र करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2013 10:13 AM IST

ताज्या बातम्या