दापोलीत भरदिवसा गावगुंडांचा घरावर हल्ला

दापोलीत भरदिवसा गावगुंडांचा घरावर हल्ला

07 जानेवारीदापोलीतल्या करंजाणी गावात एका महिलेच्या घरावर गावातल्याच काही गुंडांनी लोखंडी सळ्या आणि दगडानं भर दुपारी हल्ला केला. या प्रकरणी दापोली पोलिसांनी 5 जणांना अटक केलीय. पण मुख्य आरोपी अजूनही मोकाटच आहे. हल्ला झाला त्यावेळी ही महिला सुर्देवाने आपल्या कुटुंबांसह घराबाहेर असल्यानं या हल्ल्यातून ती बचावली. आपल्या तीन मुलांसह ही महिला राहत होती. या महिलेचा पती नोकरीनिमित्तानं मुंबईला असतो, गेल्या अनेक दिवसांपासून या महिलेला त्रास दिला जातोय. या हल्यात गावचा सरपंच, पोलीस पाटील आणि एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा आरोपही या महिलेनं केलाय. विशेष म्हणजे तंटामुक्ती समितीचा अध्यक्षाचाही यात समावेश आहे.

  • Share this:

07 जानेवारी

दापोलीतल्या करंजाणी गावात एका महिलेच्या घरावर गावातल्याच काही गुंडांनी लोखंडी सळ्या आणि दगडानं भर दुपारी हल्ला केला. या प्रकरणी दापोली पोलिसांनी 5 जणांना अटक केलीय. पण मुख्य आरोपी अजूनही मोकाटच आहे. हल्ला झाला त्यावेळी ही महिला सुर्देवाने आपल्या कुटुंबांसह घराबाहेर असल्यानं या हल्ल्यातून ती बचावली. आपल्या तीन मुलांसह ही महिला राहत होती. या महिलेचा पती नोकरीनिमित्तानं मुंबईला असतो, गेल्या अनेक दिवसांपासून या महिलेला त्रास दिला जातोय. या हल्यात गावचा सरपंच, पोलीस पाटील आणि एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा आरोपही या महिलेनं केलाय. विशेष म्हणजे तंटामुक्ती समितीचा अध्यक्षाचाही यात समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2013 12:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading