खुशखबर..!शिक्षकांसाठी तब्बल 10 हजार जागांची जम्बो भरती

खुशखबर..!शिक्षकांसाठी तब्बल 10 हजार जागांची जम्बो भरती

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या 10 हजार जागांकरता पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी :शालेय शिक्षण विभागातील बहुप्रतिक्षीत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र वेब पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत 10,001 जागांची जाहिरात काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जातींकरता १७०४, अनुसूचित जमाकरता २१४७, अनुसूचित जमाती (पेसा) ५२५, व्हि.जे.ए. ४०७, एन.टि.बी. २४०, एन.टी.सी २४०, एन.टी.डी. १९९, इमाव १७१२, इ.डब्ल्यू.एस ५४०, एस.बी.सी. २०९, एस.ई.बी.सी. ११५४, सर्व साधारण ९२४ या संवर्गातील जागांचा समावेश आहे.

पवित्र पेार्टलच्या माध्यमातून ही पहिलीच शिक्षक भरती होणार आहे. ही भरती ऑनलाइन असल्यानं भ्रष्टाचार विरहित असेल असा दावा सरकारकडून केला जात आहे.

यातून शिक्षकांच्या भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबवण्यात शासनाला यश आले आहे, असा दावा देखील सरकारनं केला आहे. विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, जेणेकरुन कमीत कमी त्रुटी राहतील असं आवाहन करण्यात आलं आहे.

सुमारे ५०००च्या वर शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी झाल्या. ६ जिल्ह्यातील बिंदू नामावलीनंतर शून्य जागा खुल्या, एसईबीसी आणि ईबीसी वर्गासाठी दिसल्यामुळे त्या सहा जिल्ह्यांच्या बिंदूनामावलीची फेरतपासणी केल्यानंतर या जागा त्वरीत भरल्या जातील, तोपर्यंत ५० टक्के तिथल्या जागा भरल्या जातील.

अशी होणार शिक्षकांची होणार भरती

- अनुसूचित जाती- १७०४

- अनुसूचित जमाती- २१४७

- अनुसूचित जमाती (पेसा)- ५२५

- व्हिजेए- ४०७

- एनटी-बी- २४०

- एनटी-सी- २४०

- एनटी-डी- १९९

- इमाव- १७१२

- इडब्ल्यूएस- ५४०

- एसबीसी- २०९

- एसईबीसी- ११५४

- सर्वसाधारण- ९२४

=================================================

सीमेवर तणाव; सुरक्षेच्या कारणास्तव अर्थसंकल्पीय अधिवेशन आजच गुंडाळणार

First published: February 28, 2019, 4:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading