नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 3 जण ठार

नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 3 जण ठार

नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

शहापूर, रवि शिंदे, 11 एप्रिल : गुरूवारची सकाळ ही नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या 3 प्रवाशांसाठी काळ बनून आली. कारण, नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील आटगाव जवळ भीषण अपघात झाला. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावरून भरधाव वेगानं धावणाऱ्या कंटेनरचा ताबा सुटला. त्यानंतर कंटेनर रेल्वे ट्रॅकवर जाऊन धडकला. मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील शहापूर-आटगाव रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये 2 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण, जखमींची प्रकृती गंभीर आहे.

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आठवले म्हणतात, 'रामराजेंना पाठिंबा द्या'

First published: April 11, 2019, 10:37 AM IST
Tags: accident

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading