शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांचा चौथरा हटवला

शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांचा चौथरा हटवला

18 डिसेंबरअखेर शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या जागेवर बांधण्यात आलेला चौथरा पहाटे शिवसेनेनं हटवला आहे. आता समाधीस्थळासाठी प्रयायी जागा देण्यात यावी यासाठी मुंबई महापालिकेत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाला काल सोमवारी एक महिनापूर्ण झाला. बाळासाहेबांवर शिवाजी पार्क (शिवतीर्था)वर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. शिवाजी पार्कवरच बाळासाहेबांचे स्मारक व्हावे अशी मागणी शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केली होती. मात्र सरकारच्या कडक भूमिकेमुळे सेनेला माघार घ्यावी लागली. पण शिवाजी पार्कवर समाधीस्थळ व्हावे यासाठी शिवसेनेनं चौथरा हटवण्यास नकार दिला. शिवाजी पार्कची जागा सेनेला एका दिवसांसाठी देण्यात आली होती. पण स्मारक,समाधीस्थळ,नामांतराच्या वादामुळे चौथरा हलवण्यास विलंब झाला. अखेर सेना नेत्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली या भेटीनंतर सेनेनं एक पाऊल मागे घेतलं. काल मध्यरात्री शिवाजी पार्कवर शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर झाले. बोचर्‍या थंडीत पार्कवरील वातावरण काहीसे तापले होते. पार्कवर पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला होता. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास या जागेभोवती मोठे पडदे लावण्यात आले आणि त्यानंतर जेसीबीच्या सहाय्यानं हा चौथरा हलवण्यात आला. या चौथर्‍याची सर्व माती एका ट्रकमध्ये भरुन समुद्रात विसर्जित करण्यात आली. चौथरा हटवला गेल्यानंतर या जागेवर एका टेबलवर बाळासाहेबांचा फोटो आणि चौथर्‍याची माती भरलेला एक कलश ठेवण्यात आला होता. पण सकाळी शिवसेनेनं या जागेचा ताबाही सोडलाय. दरम्यान, चौथरा हटवल्यानंतर शिवसैनिकांनी पार्कवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समाधीस्थळ बांधण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी हा प्रयत्न रोखला. यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. शिवसैनिकांनी घोषणाबाजीही केली पण शिवसेना नेते सदा सरवणकर ,मोहन रावले यांनी मध्यस्थी करून शिवसैनिकांची समजूत काढली. आज महापालिकेमध्ये शिवसेना शिवाजी पार्कातील जागेसाठी प्रस्ताव मांडणार आहे. त्यानंतर ही जागा मिळेल असं आश्वासन शिवसैनिकांना दिलं. त्यानंतर शिवसैनिक थोडे शांत झाले.

  • Share this:

18 डिसेंबर

अखेर शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या जागेवर बांधण्यात आलेला चौथरा पहाटे शिवसेनेनं हटवला आहे. आता समाधीस्थळासाठी प्रयायी जागा देण्यात यावी यासाठी मुंबई महापालिकेत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाला काल सोमवारी एक महिनापूर्ण झाला. बाळासाहेबांवर शिवाजी पार्क (शिवतीर्था)वर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. शिवाजी पार्कवरच बाळासाहेबांचे स्मारक व्हावे अशी मागणी शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केली होती. मात्र सरकारच्या कडक भूमिकेमुळे सेनेला माघार घ्यावी लागली. पण शिवाजी पार्कवर समाधीस्थळ व्हावे यासाठी शिवसेनेनं चौथरा हटवण्यास नकार दिला. शिवाजी पार्कची जागा सेनेला एका दिवसांसाठी देण्यात आली होती. पण स्मारक,समाधीस्थळ,नामांतराच्या वादामुळे चौथरा हलवण्यास विलंब झाला. अखेर सेना नेत्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली या भेटीनंतर सेनेनं एक पाऊल मागे घेतलं. काल मध्यरात्री शिवाजी पार्कवर शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर झाले. बोचर्‍या थंडीत पार्कवरील वातावरण काहीसे तापले होते. पार्कवर पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला होता.

रात्री बारा वाजण्याच्या सुमारास या जागेभोवती मोठे पडदे लावण्यात आले आणि त्यानंतर जेसीबीच्या सहाय्यानं हा चौथरा हलवण्यात आला. या चौथर्‍याची सर्व माती एका ट्रकमध्ये भरुन समुद्रात विसर्जित करण्यात आली. चौथरा हटवला गेल्यानंतर या जागेवर एका टेबलवर बाळासाहेबांचा फोटो आणि चौथर्‍याची माती भरलेला एक कलश ठेवण्यात आला होता. पण सकाळी शिवसेनेनं या जागेचा ताबाही सोडलाय. दरम्यान, चौथरा हटवल्यानंतर शिवसैनिकांनी पार्कवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समाधीस्थळ बांधण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी हा प्रयत्न रोखला. यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. शिवसैनिकांनी घोषणाबाजीही केली पण शिवसेना नेते सदा सरवणकर ,मोहन रावले यांनी मध्यस्थी करून शिवसैनिकांची समजूत काढली. आज महापालिकेमध्ये शिवसेना शिवाजी पार्कातील जागेसाठी प्रस्ताव मांडणार आहे. त्यानंतर ही जागा मिळेल असं आश्वासन शिवसैनिकांना दिलं. त्यानंतर शिवसैनिक थोडे शांत झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2012 06:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading