दिल्लीत चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

17 डिसेंबरराजधानी दिल्ली गेल्या काही दिवसात बलात्काराचीही जणू राजधानी झालीय. काल रात्री वसंत विहार परिसरात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडलीय. दिल्लीत चालत्या बसमध्ये मेडिकलच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार केलाय. एवढंच नाही तर या विद्यार्थीनीसोबत असलेल्या तिच्या मित्राला बेदम मारहाण करून गाडीतून बाहेर फेकून देण्यात आलंय. या तरूणीला गंभीर अवस्थेत सफदरगंज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या मुलीच्या मित्रानं आज पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हाती आलेल्या माहितीनुसार पीडित तरूणी आपल्या मित्रासोबत त्याच्या घरातून रात्री बाहेर पडली. तिचा मित्र तिला घरापर्यंत सोडणार होता. यासाठी दोघे जण मुनीरिकाजवळील बस स्टॉपवर पोहचले. या परिसरात भयान शांतता पसरलेली होती. काहीवेळ बसची वाट पाहील्यानंतर एक पर्यटक बस स्टॉपवर येऊन थांबली. ही बस पीडित मुलीच्या घरापर्यंत जाणार होती. दोघेही बसमध्ये चढले आणि 15 मिनिटानंतर बसमधील स्टॉफने मुलीची छेड काढायला सुरूवात केली. तिच्या मित्रांने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. बसमध्येच तरूणीवर त्या नराधमांनी बलात्कार करून तिला आणि तिच्या मित्राला महिपालपूरजवळ बसमधून बाहेर फेकून दिलं. पीडित तरूणीला सफदरगंज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी तिच्या मित्राच्या माहितीवरून 12 पेक्षा अधिक बसमालकांची चौकशी केली आहे. याप्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आली नाही पण 4 जणांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी यावर उत्तर द्यावं अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तर काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनीही दिल्लीला काळिमा फासणार्‍या घटनांवर अंकुश लावण्याची गरज व्यक्त केली. तसेच व्हाईट लाइन बसेसबाबत कडक धोरण अवलंबणार असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी सांगितलंय.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Dec 17, 2012 10:37 AM IST

दिल्लीत चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

17 डिसेंबर

राजधानी दिल्ली गेल्या काही दिवसात बलात्काराचीही जणू राजधानी झालीय. काल रात्री वसंत विहार परिसरात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडलीय. दिल्लीत चालत्या बसमध्ये मेडिकलच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार केलाय. एवढंच नाही तर या विद्यार्थीनीसोबत असलेल्या तिच्या मित्राला बेदम मारहाण करून गाडीतून बाहेर फेकून देण्यात आलंय. या तरूणीला गंभीर अवस्थेत सफदरगंज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या मुलीच्या मित्रानं आज पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हाती आलेल्या माहितीनुसार पीडित तरूणी आपल्या मित्रासोबत त्याच्या घरातून रात्री बाहेर पडली. तिचा मित्र तिला घरापर्यंत सोडणार होता. यासाठी दोघे जण मुनीरिकाजवळील बस स्टॉपवर पोहचले. या परिसरात भयान शांतता पसरलेली होती. काहीवेळ बसची वाट पाहील्यानंतर एक पर्यटक बस स्टॉपवर येऊन थांबली. ही बस पीडित मुलीच्या घरापर्यंत जाणार होती. दोघेही बसमध्ये चढले आणि 15 मिनिटानंतर बसमधील स्टॉफने मुलीची छेड काढायला सुरूवात केली. तिच्या मित्रांने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. बसमध्येच तरूणीवर त्या नराधमांनी बलात्कार करून तिला आणि तिच्या मित्राला महिपालपूरजवळ बसमधून बाहेर फेकून दिलं. पीडित तरूणीला सफदरगंज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी तिच्या मित्राच्या माहितीवरून 12 पेक्षा अधिक बसमालकांची चौकशी केली आहे. याप्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आली नाही पण 4 जणांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी यावर उत्तर द्यावं अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तर काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनीही दिल्लीला काळिमा फासणार्‍या घटनांवर अंकुश लावण्याची गरज व्यक्त केली. तसेच व्हाईट लाइन बसेसबाबत कडक धोरण अवलंबणार असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2012 10:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...