शिवाजी पार्कबद्दल निर्णय घेण्यास पालिका आयुक्त हतबल

शिवाजी पार्कबद्दल निर्णय घेण्यास पालिका आयुक्त हतबल

11 डिसेंबरशिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जिथे अंत्यसंस्कार झाले त्या जागेचा वाद अजूनही सुरूच आहे. याबद्दल मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी मुख्य सचिवांना पत्र लिहिलंय. या चौथर्‍याबाबत काय निर्णय घ्यावा यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती आयुक्तांनी या पत्रात केली आहे. मुंबई पालिका आयुक्तांचं मुख्य सचिवांना हे तिसरं पत्र आहे. याआधी याबाबतचा निर्णय मुंबई पालिकेनं घ्यावा असं राज्य सरकारनं सांगितलं होतं. मात्र कालावधी उलटूनही कोणतीच कारवाई करण्यास पालिकेनं पाऊल उचलले नाही. दुसरीकडे शिवाजी पार्कच नामांतर शिवतीर्थ करावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे याबद्दल खुद्द महापौर सुनील प्रभू यांनी बहुमतावर नामांतर करूनच दाखवू असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाच्या कचाट्यात अधिकारी अडकले आहे.

  • Share this:

11 डिसेंबर

शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जिथे अंत्यसंस्कार झाले त्या जागेचा वाद अजूनही सुरूच आहे. याबद्दल मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी मुख्य सचिवांना पत्र लिहिलंय. या चौथर्‍याबाबत काय निर्णय घ्यावा यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती आयुक्तांनी या पत्रात केली आहे. मुंबई पालिका आयुक्तांचं मुख्य सचिवांना हे तिसरं पत्र आहे. याआधी याबाबतचा निर्णय मुंबई पालिकेनं घ्यावा असं राज्य सरकारनं सांगितलं होतं. मात्र कालावधी उलटूनही कोणतीच कारवाई करण्यास पालिकेनं पाऊल उचलले नाही. दुसरीकडे शिवाजी पार्कच नामांतर शिवतीर्थ करावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे याबद्दल खुद्द महापौर सुनील प्रभू यांनी बहुमतावर नामांतर करूनच दाखवू असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाच्या कचाट्यात अधिकारी अडकले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2012 04:12 PM IST

ताज्या बातम्या