तटकरेंची स्वागताध्यक्षपदी निवड रत्नागिरीचा अपमान -जाधव

तटकरेंची स्वागताध्यक्षपदी निवड रत्नागिरीचा अपमान -जाधव

07 डिसेंबरजलसंपदा मंत्री सुनील तटकरे हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीत फूट पाडण्याचं कारस्थान करतायत याच कारस्थानातून चिपळूणच्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी त्यांची झालेली निवड म्हणजे रत्नागिरीचा अपमान असल्याची टीका पालकमंत्री भास्कर जाधव यांनी केली आहे. चिपळूणच्या संयोजन समितीने पालकमंत्री भास्कर जाधव यांना डावलून त्यांचे राष्ट्रवादीतलेच विरोधक सुनिल तटकरे यांना 86 व्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा मान दिलाय. यामुळे पालकमंत्री भास्कर जाधव दुखावले गेले. विशेष म्हणजे या संमेलनाचं उद्घाटन राष्ट्रवादीचेच अध्यक्ष शरद पवार करणार आहेत. तर समारोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. पण या सगळ्यात चिपळूणच्या संयोजन समितीने भास्कर जाधव यांना दूर ठेवत तटकरे-जाधव यां राष्ट्रवादीतल्याच दोन नेत्यांचा वाद चव्हाट्यावर आणलाय.

  • Share this:

07 डिसेंबर

जलसंपदा मंत्री सुनील तटकरे हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीत फूट पाडण्याचं कारस्थान करतायत याच कारस्थानातून चिपळूणच्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी त्यांची झालेली निवड म्हणजे रत्नागिरीचा अपमान असल्याची टीका पालकमंत्री भास्कर जाधव यांनी केली आहे. चिपळूणच्या संयोजन समितीने पालकमंत्री भास्कर जाधव यांना डावलून त्यांचे राष्ट्रवादीतलेच विरोधक सुनिल तटकरे यांना 86 व्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा मान दिलाय. यामुळे पालकमंत्री भास्कर जाधव दुखावले गेले. विशेष म्हणजे या संमेलनाचं उद्घाटन राष्ट्रवादीचेच अध्यक्ष शरद पवार करणार आहेत. तर समारोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. पण या सगळ्यात चिपळूणच्या संयोजन समितीने भास्कर जाधव यांना दूर ठेवत तटकरे-जाधव यां राष्ट्रवादीतल्याच दोन नेत्यांचा वाद चव्हाट्यावर आणलाय.

First published: December 7, 2012, 8:15 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading