20 नोव्हेंबर
एकीकडे वीजेचे वाढलेले दर आणि दुसरीकडे सततचं भारनियमन यामुळे मालेगावमधला यंत्रमागांचा व्यवसाय पिचला आहे. याच्याच निषेधार्थ यंत्रमागधारकांनी वीजबिलांची होळी केली. वीज दरवाढ मागे घ्यावी आणि भारनियमन रद्द करावं या मागणीसाठी अनेक वेळा अर्ज देऊनही सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधात ही होळी करण्यात आली. मालेगावमध्ये अडीच लाख यंत्रमाग आहेत. मुशवरा चौकात झालेल्या या आंदोलनाचं नेतृत्व आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी केलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा