डॉक्टरांचा हलगर्जीपणा.. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू, बाळही दगावले

डॉक्टरांचा हलगर्जीपणा.. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू, बाळही दगावले

शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळंतपणासाठी आलेल्या एका 24 वर्षीय महिलेला पोटातील बाळासह आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

असिफ मुरसळ, (प्रतिनिधी)

सांगली, 22 मे- शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळंतपणासाठी आलेल्या एका 24 वर्षीय महिलेला पोटातील बाळासह आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. प्रियांका सुनील चव्हाण असं मृत महिलेचं नाव आहे. प्रियांकाला नऊ महिने पूर्ण होऊन देखील डॉक्टरांनी तीन दिवसांपासून तिला रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. त्यामुळे प्रियांका आणि तिच्या पोटातील बाळ दगावल्याचा आरोप करण्यात येत आहे.

धक्कादायक! मुंबईत ब्राझीलच्या महिलेवर बलात्कार

प्रियांकाला नऊ महिने पूर्ण होऊन देखील डॉक्टरांनी तीन दिवसांपासून तिला इकडच्या-तिकडच्या वार्डात जा, असं सांगितले. यामध्येच मंगळवारी सायंकाळी रुग्णालयाच्या बाहेर प्रसूत वेदना सुरु झाल्या. नंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोवर तिचा मृत्यू झाला.

अमरावतीमध्ये भीषण अग्नितांडव, तब्बल 70 घरांची जळून राख

प्रियांकाला वेळेत रुग्णालयात दाखल न करुन घेता उलट तिची हेळसांड झाली. यामध्ये तिचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकानी आरोप करत प्रियांकाचा मृतदेह स्वीकारण्यीस नकार दिला आहे. दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

खर्चाला पैसे दिले नाही म्हणून मुलाने केली वडिलांची हत्या, डोंबिवलीतील घटना

दरम्यान, प्रियांकाच्या मृतदेहाची फॉरेंसिक लॅबमध्ये तपासणी करून नेमकं मृत्युच कारण शोधलं जाईल, असे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मात्र नऊ महिने पूर्ण झाले असताना प्रियांकाला रुग्णालयात दाखल करुन न घेतल्यानेच तिचा मृत्यू झाल्याने प्रियांकाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.

पिंपरीत 6 दिवसांत तीन महिलांचा मृत्यू

पिंपरीत उपचारादरम्यान 6 दिवसांत तीन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हे मृत्यू झाल्याचा आरोप संबधित रुग्णाच्या नातेवाईकांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

धनश्री जाधव, सोनम पवळे आणि सपना यांच्या गर्भातील अर्भक या तिघांनाही गमावल्याच दुःखात असलेल्या नातवाईकांकडे आता असा आक्रोश आणि संताप व्यक्त करण्यापलीकडे काहीही उरलं नाही. पिंपरीतल्या आयुर्वेद रुग्णालय स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये दातांवर शस्त्रक्रिया करताना अतिरक्तस्त्राव झाल्याने धनश्रीचा मृत्यू झाला होता. चाकण येथील आरगडे रुग्णालयात दाखल झालेल्या गरोदर नामांकित सपना यांचाही उपचारादरम्यान पोटातील बाळासह मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचे हे मृत्यू झाल्याचा आरोप नातवाईकांनी केला आहे.

VIDEO : विवेकवर भडकले अनुपम खेर, म्हणाले...

First published: May 22, 2019, 11:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading