अंबरनाथमध्ये 660 गव्हाची पोती जप्त

अंबरनाथमध्ये 660 गव्हाची पोती जप्त

20 ऑक्टोबरमहागाईच्या खाईत गरिबांना स्वस्तात अन्न धान्य उपलब्ध करून देणार्‍या रेशन दुकानाचा गहू काळ्याबाजारात विकत असल्याचं उघड झालंय. अंबरनाथ शहरातील शिधावाटप कार्यालयात आलेल्या तीन ट्रक गहू खुल्या बाजारात विकण्यासाठी नेत असल्याची माहिती अधिकार्‍याना मिळाली. आणि लगेच धाड टाकून 23 लाख 41 हजार रूपयांचा मुद्देमाल आणि 660 गव्हाची पोती ताब्यात घेतली. त्याचसोबत तीन ट्रक जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. या प्रकरणी 5 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

20 ऑक्टोबर

महागाईच्या खाईत गरिबांना स्वस्तात अन्न धान्य उपलब्ध करून देणार्‍या रेशन दुकानाचा गहू काळ्याबाजारात विकत असल्याचं उघड झालंय. अंबरनाथ शहरातील शिधावाटप कार्यालयात आलेल्या तीन ट्रक गहू खुल्या बाजारात विकण्यासाठी नेत असल्याची माहिती अधिकार्‍याना मिळाली. आणि लगेच धाड टाकून 23 लाख 41 हजार रूपयांचा मुद्देमाल आणि 660 गव्हाची पोती ताब्यात घेतली. त्याचसोबत तीन ट्रक जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. या प्रकरणी 5 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published: October 20, 2012, 3:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading