रुबेन-केनन हत्याप्रकरणाला 1 वर्ष पूर्ण ; न्याय मिळेल का ?

रुबेन-केनन हत्याप्रकरणाला 1 वर्ष पूर्ण ; न्याय मिळेल का ?

20 ऑक्टोबरमुंबईत झालेयाला रुबेन आणि केनन हत्याप्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झालं. पण या हत्या प्रकरणातल्या आरोपींवर आरोपपत्र दाखल होऊ शकलेले नाही. या प्रकरणातील चार आरोपी सध्या तळोजा जेलमध्ये आहे. सोमवारी या प्रकरणाची सुनावणी आहे. सोमवारी तरी या प्रकरणाची सुनावणी होईल का असा प्रश्न किननच्या वडिलांनी विचारला आहे.मागिल वर्षी केनन आणि रुबेन यांची चाकूने भोसकून हत्या झाली आणि रस्तावर उभे असलेलं कुणीच त्यांच्या मदतीला आलं नाही. 24 वर्षांचा केनन सँतोज आणि 28 वर्षांचा रुबेन फर्नांडिस यांची भर रस्त्यात चाकू भोसकूनं हत्या करण्यात आली. मुलीची छेड काढणार्‍यांचा विरोध केला म्हणून त्यांची हत्या झाली आणि मुंबईकर मूकदर्शक होऊन बघत होते. रुबेनचा सोमवारी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तर केनानचा 11 दिवसांआधीच मृत्यू झाला.अंधेरी भागातल्या अंबोली रेस्टॉरंटमध्ये जेवण झाल्यावर केनन, रुबेन आणि त्यांचे पाच मित्र रात्री अकरा वाजता पान खान्यासाठी म्हणून बाहेर पडले. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या जीतेंद्र राणा या मुलाने केननच्या मैत्रिणीची छेड काढली आणि यावरुन केनन आणि जीतेंद्र यांच्यात वाद झाला. या वादानंतर राणा तिथून गेला आणि थोड्या वेळातच आपल्या 20 मित्रांसोबत तो परत आला. त्यानंतर त्यांनी केनन आणि रुबेन यांची चाकू भोसकून हत्या केली. या संपूर्ण प्रकरणानंतर छेडछाडीचे गुन्हे अजामिनपात्र करण्याची मागणी करण्यात आली होती. पण एक वर्षानंतरही या प्रकरणात परिस्थिती जैसे थे आहे.

  • Share this:

20 ऑक्टोबर

मुंबईत झालेयाला रुबेन आणि केनन हत्याप्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झालं. पण या हत्या प्रकरणातल्या आरोपींवर आरोपपत्र दाखल होऊ शकलेले नाही. या प्रकरणातील चार आरोपी सध्या तळोजा जेलमध्ये आहे. सोमवारी या प्रकरणाची सुनावणी आहे. सोमवारी तरी या प्रकरणाची सुनावणी होईल का असा प्रश्न किननच्या वडिलांनी विचारला आहे.

मागिल वर्षी केनन आणि रुबेन यांची चाकूने भोसकून हत्या झाली आणि रस्तावर उभे असलेलं कुणीच त्यांच्या मदतीला आलं नाही. 24 वर्षांचा केनन सँतोज आणि 28 वर्षांचा रुबेन फर्नांडिस यांची भर रस्त्यात चाकू भोसकूनं हत्या करण्यात आली. मुलीची छेड काढणार्‍यांचा विरोध केला म्हणून त्यांची हत्या झाली आणि मुंबईकर मूकदर्शक होऊन बघत होते. रुबेनचा सोमवारी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तर केनानचा 11 दिवसांआधीच मृत्यू झाला.

अंधेरी भागातल्या अंबोली रेस्टॉरंटमध्ये जेवण झाल्यावर केनन, रुबेन आणि त्यांचे पाच मित्र रात्री अकरा वाजता पान खान्यासाठी म्हणून बाहेर पडले. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या जीतेंद्र राणा या मुलाने केननच्या मैत्रिणीची छेड काढली आणि यावरुन केनन आणि जीतेंद्र यांच्यात वाद झाला. या वादानंतर राणा तिथून गेला आणि थोड्या वेळातच आपल्या 20 मित्रांसोबत तो परत आला. त्यानंतर त्यांनी केनन आणि रुबेन यांची चाकू भोसकून हत्या केली. या संपूर्ण प्रकरणानंतर छेडछाडीचे गुन्हे अजामिनपात्र करण्याची मागणी करण्यात आली होती. पण एक वर्षानंतरही या प्रकरणात परिस्थिती जैसे थे आहे.

First published: October 20, 2012, 10:47 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading