News18 Lokmat

सलाम पोलीस शिपाई विजय खांडेकरांना !

30 नोव्हेंबर, मुंबईगोविंद तुपे ज्या पोलीस अधिकार्‍यांनी मुंबईच्या अतिरेकी हल्ल्यांत आपले प्राण गमावले. त्यांच्या कुटुंबासमोर मात्र दु:खाचा डोंगर उभा राहिला आहे. पोलीस खात्यात वायरलेस ऑपरेटर म्हणून एकेकाळी काम करणा-या विजय खांडेकर यांच्या घरी काही वेगळी परिस्थिती नीहीये.1992 साली पोलीस खात्यात भरती झालेले कामा हॉस्पिटलमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकित विजय खांडेकर शहीद झालेत. विजय खांडेकर यांच्याबरोबर पोलीस खात्यात काम करणा-या त्यांच्या मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. पोलिस शिपाई सुनिल पाटील सांगतात," विजयने कधीच कोणत्याही कामाला नाही म्हटलेलं नाही. सगळ्यांच्या तो उपयोगी पडायचा. त्याच्या या गुणामुळेच तो सगळ्यांना आवडायचा. " "आपले बाबा केव्हा येणार, बाबाला कुठे घेऊन गेलेत, हा प्रश्न विजय खांडेकरांची पाच वर्षांची मुलगी समृध्दी सतत तिच्या काकांना विचारत असते. तिच्या प्रश्नाने विजय खांडेकरांचे भाऊ अशोक खांडेकर घायाळ होतात. ज्या दिवशी मुंबईत हे घातपाती कृत्य घडलं त्यादिवशी सकाळी ' कामवरून आल्यानंतर पत्नीला सिध्दीविनायकला घेऊन जातो, ' असं अश्वासन देऊन गेलेले खांडेकर परतलेच नाहीत. आपल्या पत्नीला दिलेल्या आश्वासनापेक्षा कर्तव्याला पहिलं प्राधान्य दिणा-या विजय खांडेकरांच्या आठवणी मीडियाला सांगताना त्यांच्या मित्रांना हंुदका आवरणं कठीण जात होतं.विजय खांडेकरांच्या दु:खात बुडालेल्या कुटुंबाला समृध्दीच्या भविष्याची चिंता लागून राहिली आहे . दुसर्‍याचे जीव वाचवणार्‍या या धाडसी शिपायाच्य पत्नीला सरकारनं तात्पुरत्या स्वरूपाची मदत करण्याऐवजी सरकारी खात्यात नोकरी द्यावी, अशी विनंती विजयचे कुटुंब आणि मित्र करत आहेत.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Nov 30, 2008 12:57 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2008 12:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...