नागपूर, 05 एप्रिल: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नागपूर येथील सभेत पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. चौकीदार या शब्दावरून पुन्हा एकदा मोदींवर हल्ला करत राहुल गांधी यांनी निवडणुकीनंतर चौकशी होईल आणि जेलमध्ये आणखी एक चौकीदार असेल असा इशाराच मोदींनी दिला.