परतीच्या पावसाने परभणीला झोडपले

परतीच्या पावसाने परभणीला झोडपले

03 ऑक्टोबरपरतीच्या पावसानं परभणी आणि आजूबाजूच्या परिसराला झोडपून काढलंय. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 42 मीमी पाऊस झाला. अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय पाथरी तालुक्याला. पाथरीत 24 तासांत 128 मिमी पाऊस झाला. तब्बल 18 दिवसानंतर आलेल्या या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला असला तरी पावसाचा जोर जास्त असल्यानं शेतकर्‍यांना फटका बसलाय. कापुस, सोयाबीन, मुग हळद या नगदीपिकांनाही याचा फटका बसला. तर शहरातली मुख्य बाजारपेठ असलेल्या शिवाजी चौक, गांधी पार्क या भागातल्या दुकानांमध्ये पाणी शिरले.

  • Share this:

03 ऑक्टोबर

परतीच्या पावसानं परभणी आणि आजूबाजूच्या परिसराला झोडपून काढलंय. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 42 मीमी पाऊस झाला. अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय पाथरी तालुक्याला. पाथरीत 24 तासांत 128 मिमी पाऊस झाला. तब्बल 18 दिवसानंतर आलेल्या या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला असला तरी पावसाचा जोर जास्त असल्यानं शेतकर्‍यांना फटका बसलाय. कापुस, सोयाबीन, मुग हळद या नगदीपिकांनाही याचा फटका बसला. तर शहरातली मुख्य बाजारपेठ असलेल्या शिवाजी चौक, गांधी पार्क या भागातल्या दुकानांमध्ये पाणी शिरले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2012 02:58 PM IST

ताज्या बातम्या