प्रियांकाबद्दल विचारल्यावर उखडला सलमान खान, म्हणाला...

प्रियांकाबद्दल विचारल्यावर उखडला सलमान खान, म्हणाला...

सलमाननं प्रियांकाला टोमणा मारायची एकही संधी आता पर्यंत सोडली नाही. भारत प्रमोशनच्या प्रत्येक इव्हेन्टमध्ये सलमान प्रियांकावर उपरोधिक कमेंट करताना दिसतो.

  • Share this:

मुंबई, 21 मे : बॉलिवूडचा दबंग सलमान खान सोबत काम करण्याची प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते. पण काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रानं सलमानचा बहुचर्चित सिनेमा भारत नाकारल्यानं सर्वांनाच धक्का बसला. तिच्या जागेवर निर्मात्यांनी कतरिना कैफला संधी दिली मात्र सलमाननं त्यानंतर प्रियांकाला टोमणा मारायची एकही संधी आता पर्यंत सोडली नाही . भारत प्रमोशनच्या प्रत्येक इव्हेन्टमध्ये सलमान प्रियांकावर उपरोधिक कमेंट करताना दिसतो.

नुकतच मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत सलमानला प्रियांका सोबत पुन्हा काम करशील का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सलमान म्हणाला, 'मी प्रियांकाचा आभारी आहे. तिनं सिनेमा सोडला नसता तर आम्ही कतरिनाला या सिनेमात घेऊ शकलो नसतो. भारतच्या शूटिंगच्या अवघ्या 5 दिवस अगोदर प्रियांकान हा सिनेमा करण्यास नकार दिला. तिनं हा सिनेमा न करण्यामागे लग्नाचं कारण दिलं.  मी तिला तारखा बदलून आपण शूटिंग पुढे ढकलण्याचं सुचवलं होतं पण तरीही तिनं सिनेमाला नकार दिला. म्हणजे ती निर्णय बदलण्यासाठी आली नव्हती तर मला सिनेमा करायचाच नाही हे सांगण्यासाठी आली होती.'

 

View this post on Instagram

 

‪#Bharat #Eid2019 ‬

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमान पुढे म्हणाला, सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रियांकानं मला एकही कॉल केला नाही. इतर कोणतीही महिला भारतासाठी आपल्या पतीला सोडलं असतं पण प्रियांकानं पतीसाठी 'भारत' सोडला. मी तिच्यासोबत पुन्हा काम नक्कीच करेन पण जर तशी एखादी चांगली स्टोरी मिळाल्यास मी तिच्यासोबत भविष्यात नक्की काम करेन. हा सिनेमा प्रियांकानं सोडल्यानं चाहते थोडे नाराज झाले पण या सिनेमासाठी कतरिनानंही खूप मेहनत घेतली आहे. तिला या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार नक्की मिळेल.

SPECIAL REPORT : विवेक ओबेरॉयच्या मीमचा असा घेतला टि्वटरकरांनी बदला

First published: May 22, 2019, 10:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading