लॉकडाऊननंतर ‘तारक मेहता…’मध्ये दयाबेन करणार कमबॅक! निर्मात्यांनी सांगितलं सत्य

लॉकडाऊननंतर ‘तारक मेहता…’मध्ये दयाबेन करणार कमबॅक! निर्मात्यांनी सांगितलं सत्य

मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेली अभिनेत्री दिशा वकानी लॉकडाऊननंतर या शोमध्ये वापसी करणार असल्याचं बोललं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 13 जून : कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ सर्वात लोकप्रिय शो मानला जातो. मागच्या अनेक वर्षांपासून या शोनं सर्वांना हसवण्याचं काम केलं आहे. हेच कारण आहे की आजही हा शो तेवढ्याच टीआरपीमध्ये चालत आहे. काही दिवसांपूर्वीच अनलॉक 1 मध्ये देण्यात आलेल्या शिथीलतेत या शोचं शूटिंग सुरू होणार आहे. अशात मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेली अभिनेत्री दिशा वकानी या शोमध्ये वापसी करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र आता याबाबत या शोचे प्रोड्युसर असित कुमार मोदी यांनी मौन सोडलं आहे.

मागच्या काही दिवसांपासून दिशा वकानी या शोमध्ये परत येणार असून या शोच्या सेटवर एक सेलिब्रेशनही केलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. कारण या शोला 12 वर्षं पूर्ण झाली आहेत. यानंतर पिंकव्हिलाला दिलेल्या एका मुलाखतीत या शोचे प्रोड्युसर असित कुमार मोदी यांनी दिशाच्या शो वापसीवर मौन सोडलं. ते सुरुवातीला हसले आणि म्हणाले, आधी शोचं शूटिंग सुरू तर होऊ देत. मी सध्या याबाबत काहीही सांगू शकत नाही. सध्या आम्ही शूटिंग पुन्हा सुरू करण्याची तयारी करत आहोत. जेव्हा शूटिंग सुरू होईल तेव्हा मी याबाबत काही सांगू शकतो.

‘मिस वर्ल्ड झालीस म्हणून तू अभिनेत्री होशील?’ प्रियांकावर का ओरडला कोरिओग्राफर

असित कुमार मोदी पुढे म्हणाले, महाराष्ट्र सरकारनं आम्हाला शूटिंगला परवानगी दिली आहे आणि मी त्यांच्या निर्णयावर खूप खूश आहे. सध्या आम्ही हे शूटिंग पुन्हा सुरू करण्याची तयारी करत आहोत. आशा करतो की, लवकरच सर्वकाही ठिक होईल. आम्ही सरकारच्या गाइडलाइन्सचं पालन करून शूटिंग लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच नवे एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दयाबेनची भूमिका साकरणारी अभिनेत्री दिशा वकानी 2017 पासून या शोमध्ये दिसलेली नाही. मॅटरनिटी लिव्हवर गेलेली दिशा अद्याप या शोमध्ये परतलेली नाही. मागच्या काही काळापासून तिच्या कमबॅकच्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. मात्र प्रेक्षकांच्या पदरी निराशेव्यतिरिक्त आणखी काहीच पडलं नाही.

टायगर श्रॉफ नाही तर हा अभिनेता होता दिशा पाटनीचं पहिलं प्रेम, पण...

First published: June 13, 2020, 2:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading