तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्या शिवाय राहणार नाही, मनसे नेत्याचा खळ्ळ-खट्याक इशारा

तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्या शिवाय राहणार नाही, मनसे नेत्याचा खळ्ळ-खट्याक इशारा

‘सध्या महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली स्वतःच्या तुमड्या भरून घेत आहेत त्यांना एकच इशारा आहे’

  • Share this:

मुंबई, 13 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. विरोधकाकडून आरोग्य सेवेवरून अनेक आरोप केले जात आहे. अशातच मुंबई महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी आपल्या तुमड्या भरत आहेत, कोरोना झाल्यावर तुम्हाला फोडून राहिल्या शिवाय राहणार नाही, असा थेट इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा रुग्णाल् मदत करताना आलेल्या अडचणीमुळे अश्रू अनावर झाले होते. रुग्णांना वेळेवर मदत करा, असं भावनिक आवाहन देशपांडे यांनी केलं होतं . आज संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून महापालिकेतील अधिकाऱ्यांना मनसे स्टाईल इशारा दिला आहे.

‘सध्या महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली स्वतःच्या तुमड्या भरून घेत आहेत त्यांना एकच इशारा आहे. तुमच्यावर आमची करडी नजर आहे हे कोरोनाचे संकट गेलं की, तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्या शिवाय हा महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही’ असा थेट इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.

हेही वाचा-चांगली बातमी! महाराष्ट्रात आता कोरोना चाचणीचे दर सर्वात कमी

काही दिवसांपूर्वी संदीप देशपांडे यांनी एका वृद्ध व्यक्तीला मदत करण्यासाठी धावून आले होते. परंतु, 196 वर फोन करून सुद्धा कोणत्याही रुग्णालयात बेड्स मिळाले नाही. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला, पालिकेचे अधिकारी हे फोन उचलत नाही, फोनवर खोटी माहिती देतात. खाटा उपलब्ध असतानाही उपलब्ध करून दिल्या जात नाही, असा आरोप देशपांडे यांनी केला होता.

संपादन - सचिन साळवे

First published: June 13, 2020, 1:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading