मुंबईत कोरोनाबाधितांचा मृतदेह ठेवण्याच्या बॅगमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप, भाजपने केली नवी मागणी

मुंबईत कोरोनाबाधितांचा मृतदेह ठेवण्याच्या बॅगमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप, भाजपने केली नवी मागणी

हे कंत्राट देण्याचा प्रयत्न करुन घोटाळा करण्याचा प्रयत्न कोणी केला? हे समोर आले पाहिजे अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 जून : कोरोनाबाधितांचे मृतदेह ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक बॅग्सच्या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर मुंबई मनपानं त्याचं कंत्राट रद्द केलं आहे. पण हे कंत्राट देण्याचा प्रयत्न करुन घोटाळा करण्याचा प्रयत्न कोणी केला? हे समोर आले पाहिजे अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

कोरोना बाधितांचे मृतदेह ठेवण्यासाठीच्या एका प्लास्टिक बॅगची किंमत 6719रुपये इतकी ठरवण्यात आली होती. मात्र हे दर अवाजवी असल्याची तक्रार भाजपसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. वेदांत इनोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हे कंत्राट मिळालं होतं. या बॅग्सची किंमत 250 ते 1200 पर्यंत असू शकते मग 6719चा आकडा कुठून आला असा सवाल विचारण्यात आला होता.

मुंबई मनपाच्या खरेदी विभागाने एप्रिलमध्ये पहिली निविदा काढून 1.15 कोटी रुपयांच्या 2200 बॅग्स खरेदी केल्या होत्या. आता मात्र हे कंत्राट रद्द करण्यात आलं आहे. आता हे कंत्राट रद्द केलं गेलं असले तरीही मागणी केली जाती आहे तशी या प्रकरणाची चौकशी होणार का हे पाहावं लागेल.

काय आहे महानगरपालिकेचं म्हणणं?

'कोविड-19' ने बाधित झालेल्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार सदर मृतदेह 'बॉडी बॅग' मध्ये ठेऊन अंत्यसंस्कारासाठी दिला जातो. बृहन्मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांसाठी करण्यात आलेल्या या बॉडीबॅग्जच्या खरेदीच्या अनुषंगाने समाज- माध्यमांवर चुकीची चर्चा सुरू आहे. तसेच भविष्यातील 'बॉडी बॅग्ज'ची संभाव्य गरज लक्षात घेऊन दिनांक 23 मे 2020 रोजी काढण्यात आलेल्या निविदेला तांत्रिक दृष्ट्या सक्षम संस्थांचा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने सदर निविदा प्रक्रिया रद्द करुन नव्याने निविदा काढण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 13, 2020, 11:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading