सुनील तटकरेंची अँटी करप्शन ब्युरोकडून चौकशी

सुनील तटकरेंची अँटी करप्शन ब्युरोकडून चौकशी

27 सप्टेंबरएकीकडे जलसंपदा खात्यातील घोटाळ्याच्या आरोपामुळे अजित पवारांनी राजीनामा दिला असताना आता जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या चौकशीला ऍन्टी करप्शन ब्युरोनं सुरुवात केली आहे. बेहिशेबी मालमत्ता भ्रष्टाचार आणि जमीन बळकावल्याचा तटकरेंवर आरोप आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. सुनील तटकरे यांनी आपल्या कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या नावे 140 कंपन्या उघडण्याचा पराक्रम केला असून या कंपन्यांच्या माध्यमातून महसूल बुडवून बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप तटकरेंवर आहे. आयबीएन लोकमतने सर्वात प्रथम ही बाब उघड केली होती.

  • Share this:

27 सप्टेंबर

एकीकडे जलसंपदा खात्यातील घोटाळ्याच्या आरोपामुळे अजित पवारांनी राजीनामा दिला असताना आता जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या चौकशीला ऍन्टी करप्शन ब्युरोनं सुरुवात केली आहे. बेहिशेबी मालमत्ता भ्रष्टाचार आणि जमीन बळकावल्याचा तटकरेंवर आरोप आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. सुनील तटकरे यांनी आपल्या कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या नावे 140 कंपन्या उघडण्याचा पराक्रम केला असून या कंपन्यांच्या माध्यमातून महसूल बुडवून बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप तटकरेंवर आहे. आयबीएन लोकमतने सर्वात प्रथम ही बाब उघड केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2012 11:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading