24 सप्टेंबर
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोमवारी अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. यावेळी अहमद पटेल, मोतीलाल व्होराही हजर होते. 10 जनपथवर ही बैठक झाली. दरम्यान राज्यातल्या 6 जिल्हा बँकांना कर्जपरतीची मुदत वाढवून द्यावी, आणि आर्थिक सहाय्य करावं यासाठी मुख्यमंत्री पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेणार आहेत. यावेळी कृषीमंत्री शरद पवारही त्यांच्यासोबत असण्याची शक्यता आहे. या विषयावर गेल्या शनिवारी शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा