केंद्रीय मंत्रिमंडळात येणार 15 नवे चेहरे ?

केंद्रीय मंत्रिमंडळात येणार 15 नवे चेहरे ?

24 सप्टेंबरकेंद्रीय मंत्रिमंडळात या आठवड्यात फेरबदल होण्याची शक्यता आहे. उद्या किंवा जास्तीत जास्त 28 सप्टेंबरपर्यंत फेरबदल होऊ शकतात. या फेरबदलात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक यांचं पद जाऊ शकतं. तर 15 नवे चेहरे मंत्रिमंडळात येण्याची शक्यता आहे. त्यात महाराष्ट्रातून विलास मुत्तेमवार यांचं नाव चर्चेत आहे. तर गुरुदास कामत यांची पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांना शह देण्यासाठी पश्चिम बंगालमधून ममतांचे विरोधक प्रदीप भट्टाचार्य आणि दीपा दासमुन्शी यांना संधी मिळू शकते. दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवींना मंत्रिपद मिळू शकतं. अगाथा संगमा यांना राष्ट्रवादी कदाचित राजीनामा द्यायला सांगण्याची शक्यता आहे. तर त्यांच्या जागी तारिक अन्वर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी राष्ट्रवादीने खात बदलून मागितल्याचीही चर्चा आहे. माजी परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांनाही पुन्हा संधी मिळू शकते तर मुकूल वासनिक यांचं मंत्रिपद जाऊ शकतं.

  • Share this:

24 सप्टेंबर

केंद्रीय मंत्रिमंडळात या आठवड्यात फेरबदल होण्याची शक्यता आहे. उद्या किंवा जास्तीत जास्त 28 सप्टेंबरपर्यंत फेरबदल होऊ शकतात. या फेरबदलात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक यांचं पद जाऊ शकतं. तर 15 नवे चेहरे मंत्रिमंडळात येण्याची शक्यता आहे. त्यात महाराष्ट्रातून विलास मुत्तेमवार यांचं नाव चर्चेत आहे. तर गुरुदास कामत यांची पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांना शह देण्यासाठी पश्चिम बंगालमधून ममतांचे विरोधक प्रदीप भट्टाचार्य आणि दीपा दासमुन्शी यांना संधी मिळू शकते. दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवींना मंत्रिपद मिळू शकतं. अगाथा संगमा यांना राष्ट्रवादी कदाचित राजीनामा द्यायला सांगण्याची शक्यता आहे. तर त्यांच्या जागी तारिक अन्वर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी राष्ट्रवादीने खात बदलून मागितल्याचीही चर्चा आहे. माजी परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांनाही पुन्हा संधी मिळू शकते तर मुकूल वासनिक यांचं मंत्रिपद जाऊ शकतं.

First published: September 24, 2012, 9:59 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading