तृणमूलच्या मंत्र्यांचे राजीनामे

तृणमूलच्या मंत्र्यांचे राजीनामे

21 सप्टेंबरअखेर आता संपूर्णपणे तृणमूल काँग्रेस आणि यूपीए सरकारचे संबंध संपुष्टात आले आहे. तृणमूलच्या सर्व सहा केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे राजीनामे सोपवले असून पक्षाचा पाठिंबा काढत असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे. डिझेलच्या किंमतीत दरवाढ,एफडीआयचा निर्णयामुळे संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी कठोर पाऊलं उचलत थेट यूपीएतून बाहेर पडण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला होता. या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. आम्हाला विचारात घेऊन कोणतेही निर्णय घेतले जात नाही, आमचा आदर राखला जात नाही असं सांगत ममतांनी पाठिंबा काढून घेतला. तृणमूलच्या पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार अल्पमतात आले. पण ऐन वेळी 'संकटमोचक' रुपात सपाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव धावून आले आणि सपाचा पाठिंबा कायम असल्याचं स्पष्ट केलं. सपाच्या पाठिंब्यामुळे यूपीएला दिलासा मिळाला आहे.तीन वर्षं चाललेल्या तृणमूल आणि काँग्रेसच्या संसाराचा शुक्रवारी दुपारी 4 वाजता काडीमोड झाला. तृणूमल काँग्रेसच्या सहा मंत्र्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन आपले राजीनामे सोपवले. तिथून हे सहा मंत्री राष्ट्रपती भवनात पोहोचले आणि त्यांनी सरकारचा पाठिंबा काढल्याचं पत्र राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिलं. आपला निर्णय जाहीर केल्यानंतर फेरविचारासाठी सरकारला दोन दिवसांचा अवधी देणार्‍या ममता आता अधिकृतपणे यूपीएबाहेर पडल्यात.. 2008 सालची पुनरावृत्ती करत..सरकारला सावरण्यासाठी मुलायम सिंह यांनी पुन्हा एकदा धाव घेतली. आणि यूपीएला बाहेरून पाठिंबा कायम ठेवण्याची घोषणा त्यांनी दुपारीच केली. त्यामुळे सरकारला सध्या दिलासा मिळालाय. पण तिसर्‍या आघाडीची घोषणा करत त्यांनी अनिश्चिततेची टांगती तलवार कायम ठेवली. तृणमूलचे 18 खासदार यूपीएच्या बाहेर पडल्यानं काँग्रेस आता पुढची रणनीती ठरवतंय. पण सरकारजवळ पुरेसं बहुमत असल्यानं कोणताही धोका नसल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. मुलायम सिंगांच्या 22 खासदारांच्या पाठिंब्यामुळे सध्यातरी सरकारला दिलासा मिळालाय. पण सरकारच्या सुधारणांच्या धडाक्याला पंतप्रधानपदाचे बांशिंग बांधलेले मुलासम किती काळ पाठिंबा देतात. या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल. तृणमूलचे केंद्रातले मंत्रीरेल्वे मंत्री - मुकुल रॉयनगर विकास राज्यमंत्री - सौगाता रॉयआरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री - सुदीप बंडोपाध्यायमाहिती आणि प्रसारण राज्यमंत्री - चौधरी मोहन जतुआपर्यटन राज्यमंत्री - सुलतान अहमदग्रामविकास राज्यमंत्री - शिशिरकुमार अधिकारी

  • Share this:

21 सप्टेंबर

अखेर आता संपूर्णपणे तृणमूल काँग्रेस आणि यूपीए सरकारचे संबंध संपुष्टात आले आहे. तृणमूलच्या सर्व सहा केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे राजीनामे सोपवले असून पक्षाचा पाठिंबा काढत असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे. डिझेलच्या किंमतीत दरवाढ,एफडीआयचा निर्णयामुळे संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी कठोर पाऊलं उचलत थेट यूपीएतून बाहेर पडण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला होता. या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. आम्हाला विचारात घेऊन कोणतेही निर्णय घेतले जात नाही, आमचा आदर राखला जात नाही असं सांगत ममतांनी पाठिंबा काढून घेतला. तृणमूलच्या पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार अल्पमतात आले. पण ऐन वेळी 'संकटमोचक' रुपात सपाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव धावून आले आणि सपाचा पाठिंबा कायम असल्याचं स्पष्ट केलं. सपाच्या पाठिंब्यामुळे यूपीएला दिलासा मिळाला आहे.

तीन वर्षं चाललेल्या तृणमूल आणि काँग्रेसच्या संसाराचा शुक्रवारी दुपारी 4 वाजता काडीमोड झाला. तृणूमल काँग्रेसच्या सहा मंत्र्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन आपले राजीनामे सोपवले. तिथून हे सहा मंत्री राष्ट्रपती भवनात पोहोचले आणि त्यांनी सरकारचा पाठिंबा काढल्याचं पत्र राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिलं. आपला निर्णय जाहीर केल्यानंतर फेरविचारासाठी सरकारला दोन दिवसांचा अवधी देणार्‍या ममता आता अधिकृतपणे यूपीएबाहेर पडल्यात..

2008 सालची पुनरावृत्ती करत..सरकारला सावरण्यासाठी मुलायम सिंह यांनी पुन्हा एकदा धाव घेतली. आणि यूपीएला बाहेरून पाठिंबा कायम ठेवण्याची घोषणा त्यांनी दुपारीच केली. त्यामुळे सरकारला सध्या दिलासा मिळालाय. पण तिसर्‍या आघाडीची घोषणा करत त्यांनी अनिश्चिततेची टांगती तलवार कायम ठेवली.

तृणमूलचे 18 खासदार यूपीएच्या बाहेर पडल्यानं काँग्रेस आता पुढची रणनीती ठरवतंय. पण सरकारजवळ पुरेसं बहुमत असल्यानं कोणताही धोका नसल्याचं काँग्रेसनं म्हटलंय.

मुलायम सिंगांच्या 22 खासदारांच्या पाठिंब्यामुळे सध्यातरी सरकारला दिलासा मिळालाय. पण सरकारच्या सुधारणांच्या धडाक्याला पंतप्रधानपदाचे बांशिंग बांधलेले मुलासम किती काळ पाठिंबा देतात. या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल.

तृणमूलचे केंद्रातले मंत्रीरेल्वे मंत्री - मुकुल रॉयनगर विकास राज्यमंत्री - सौगाता रॉयआरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री - सुदीप बंडोपाध्यायमाहिती आणि प्रसारण राज्यमंत्री - चौधरी मोहन जतुआपर्यटन राज्यमंत्री - सुलतान अहमदग्रामविकास राज्यमंत्री - शिशिरकुमार अधिकारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2012 11:05 AM IST

ताज्या बातम्या