Elec-widget

इतिहास ताज हॉटेलचा

इतिहास ताज हॉटेलचा

29 नोव्हेंबर, मुंबई मुंबईची आन, बान आणि शान म्हणजे ताज हॉटेल. मुंबईत येणारा प्रत्येकजण गेटवे ऑफ इंडियाला भेट देतो, तसा तो ताजकडंही डोळे भरून पहातो. याच ताज हॉटेलवर अतिरेक्यांनी हल्ला चढवला आणि त्याच्या सौंदर्यालाही धक्का बसवला तेव्हा अनेकांना आठवला तो ताजचा इतिहास. 1865 मध्ये मुंबईतल्या प्रसिद्ध वॉटसन हॉटेलमध्ये तिथल्या दरबानानं जमशेदजींना जाण्यास मज्जाव केला. ते हॉटेल फक्त इंग्रजांसाठीच होतं. हा अपमान टाटांना सहन झाला नाही. त्याचवेळी त्यांनी भारतीयांसाठी आंतरराष्ट्रीय तोडीचं हॉटेल बनवण्याचा निश्चय केला होता. त्यातूनच ताजची निर्मिती झाली. 16 डिसेंबर 1903 साली जमशेदजी टाटांमुळे ताज हॉटेलची वास्तू बांधली गेली. त्यांनी ताजचा स्वत:च्या मुलासारखा सांभाळ केला. प्रसंगी, जमशेदजींकडे पैसे नसायचे, पण त्यांनी ताजचं संवर्धन खंबीरपणे केलं. 1928 मध्ये गेट वे ऑफ इंडियाची वास्तू बांधली गेली. गेटवे ऑफ इंडियाच्या कमानीतून ताज दिसतो. 1970 मध्ये जमशेदजींनी जुन्या ताजच्या बाजूला एक जागा खरेदी केली आणि नवीन ताजमहाल टॉवर बांधला. त्यावेळी भारताच्या इतिहासात ताजला मानाचं स्थान मिळालं. ताजचं सौंदर्य प्रत्येकाला भुरळ घालतं. समुद्रकिनारी येणार्‍या प्रत्येकाशी ताजचं जिव्हाळ्याचं नातं बनलं आहे. बडे उद्योजक, राजकारणी असो की परदेशी पर्यटक... प्रत्येकजण विश्रांतीसाठी इथं येतोच.. हॉटेल इंडस्ट्रीची कोट्यवधींची उलाढाल इथं होते. गेले तीन दिवस ' ताज 'ने जे काही पाहिलं, सहन केलं, त्यामुळे कदाचित त्याची शान कमी झाली आहे. पण पुन्हा एकदा नव्या दमानं आपल्या सगळ्यांसमोर उभा राहणार आहे. देशासाठी.... देशाची शान म्हणून..!!

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2008 03:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...