कट मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याचा

कट मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याचा

मुंबईत झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानमध्ये रचण्यात आला होता. आणि दहशतवादी समुद्रमार्गानं आले होते. लोकांना मारण्याचा ठोस प्लान घेऊन दहशतवादी मुंबईत आले होते, हे स्पष्ट झालंआहे. पोलिसांच्या चोरलेल्या गाडीतून बेछूट गोळीबार करणार्‍या एका अतिरेक्याला मुंबई पोलिसांनी जिवंत पकडलं आहे. मुंबईत 60 तासाहून अधिक काळ चाललेल्या थरारनाट्यात जिवंत सापडलेला तो एकमेव अतिरेकी आहे. मोहम्मद अजमल मोहम्मद आमीर कसव असं त्याचं नाव आहे. मुंबई हल्ल्याच्या कटाची तपशीलवार माहिती त्यानं पोलिसांना दिली आहे. हल्ल्याच्या ठिकाणांचा नकाशा तोंडपाठ करण्यासाठी खास गट तयार करण्यात आला होता. त्यांनी हल्ला केलेल्या दोन हॉटेल्सचं लेआऊटही त्यांच्याकडं होतं. मुंबईत प्रवेश केल्यानंतर ते दोन गटात विभागले गेले. या गटांमध्ये एकमेकांशी कोणताच संपर्क नव्हता.शस्त्रसज्ज जहाजानिशी ते 15 ऑक्टोबरला कराचीहून मुंबईकडं यायला निघाले. नंतर त्यांनी एका भारतीय जहाजाचं अपहरण केलं. आणि मुंबईला पोचण्यापूर्वी त्याच्यावरच्या कर्मचार्‍यांचा खून केला. सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी त्यांनी ठार मारलेल्या कर्मचार्‍यांचं काही सामान सोबत घेतलं. मुंबईत इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी टॅक्सीही भाड्यांनं घेतली होती. यादरम्यान त्यांनी आपल्यासोबत सतत एके-47, एके-56, हँडग्रेनेड, आरडीएक्स, जिवंत फैर्‍या आणि मॅगझिन्स होते. मरेपर्यंत लोकांना मारण्याच्या सूचना या अतिरेक्यांना देण्यात आल्या होत्या, अशी आणखी एक धक्कादायक माहिती मोहम्मद अजमल मोहम्मद आमीर कसव यानं दिली आहे. 500 लोकांना मारण्याचा हा कट असवा असं उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचं म्हणणं आहे. गुप्तचर संस्थांनी सीएनएनआयबीएअनला माहिती दिलीय की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा या हल्ल्यात हात आहे. कारण कराची आणि त्याशेजारच्या काही बंदरांवर दाऊदची पकड आहे. दहशतवाद्यांनी वापरलेल्या बोटीची तपशील गुप्तचर संस्थांनी मागवला आहे. अतिरेकी मोहम्मद अजमल मोहम्मद आमीर कसव याच्या माहितीवरून हा पूर्वनयोजीत कट असल्याचं सत्य समोर आलं आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2008 03:47 PM IST

ताज्या बातम्या