सलाम सफाई कर्मचारी बुधा ठाकूर दशरथ वाघेलांना !

30 नोव्हेंबर, मुंबईप्रीती खान शत्रूलाही पाण्यासाठी नाही म्हणू नये असं म्हणतात. हाच जीटी हॉस्पिटलमध्ये सफाई कर्मचारी बुधा ठाकूर वाघेला यांचाही धर्म होता. पण त्याच पाण्याच्या बदल्यात वाघेलाला आपला जीव गमवावा लागला आहे. दहशतवाद्यांना माणुसकी नसते, ते उलट्या काळजाचे असतात त्याची प्रचिती ठाकूर दशरथ वाघेलांना 26 नोव्हेंबरच्या रात्री आली. कामा हॉस्पिटलच्या मागच्या गल्लीत बुधा ठाकूर वाघेला यांचं घर आहे. वाघेला जीटी हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार म्हणूल काम करत होते. त्यामुळे त्याच्या स्वभावात आरपार मुरलेला सेवाभाव पाणी मागणार्‍या अतिरेक्याशी वागतानाही बदलला नाही. पण हे त्या माथेफिरू अतिरेक्याला काही कळलं नाही. 26 नोव्हेंबरच्या रात्री वाघेला आपल्या बैठ्या घरी जेवत होते. काम हॉस्पिटलमधून पळून जाताना एका अतिरेक्याला तहान लागली. त्या अतिरेक्याला वाघेलांचं उघडं घर दिसलं. आतिरेक्यांनी वाघेलांकडे पाणी मागितलं. वाघेलांनी जेवत्या ताटावरून उठून ते दिलं. त्या मोबदतल्यात अतिरेक्यांनी त्यांचा जीव घेतला. ठाकूर वाघेलांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाची कु-हाड कोसळली आहे. " मुझे बाकी कुछ नहीं चाहिये...मुझे बस मेरा पती चाहिये.., " असं म्हणत दशरथची पत्नी धाय मोकलून रडत आहे. तर बुधा ठाकूर दशरथ वाघेलांच्या वृद्ध आईकडे त्यांच्या आठवणी शिल्लक राहिल्या आहेत.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2008 03:43 PM IST

ताज्या बातम्या