विदेशी पर्यटकांचं भारत प्रेम अजूनही कायम

30 नोव्हेंबर, मुंबई अलका धुपकर वुई विल कम टू इंडिया अगेन.... हे शब्द आहेत आंद्रीना व्हेनेगना आणि सॅटोंस लोपेझ या जोडप्याचे. आंद्रीना आणि तिचा सॅटोंस हे दोघंही भारत दोन आठवड्यांच्या सुट्टीवर भारतात फिरायला आले होते. त्यांच्या ग्रुपची पार्टी ताजमध्ये चालू होती. अचानक 26 नोव्हेंबरच्या रात्री हॉटेल ताजमध्ये गोळीबार सुरू झाला. या गोळीबारात आंद्रीनाच्या पायला गोळी लागली. ती त्यात जबर जखमी झाली आहे. ती सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आंद्रीना व्हेनेगना इटालियन अमेरिकेन आहे. योगामुळे तिला भारताचं आकर्षण होतं. आणि दोन आठवड्यांच्या सुट्टीवर ती भारतात फिरायला आलेली. पण त्यांच्या ग्रुपची पार्टी ताजमध्ये चालू असताना गोळीबार सुरू झाला. "गोळीबार का झाला हे कळायला मार्गच नव्हता. प्रत्येकाने लपण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येकजण आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात होता. नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात निभावलं, " असं आंद्रीना आणि सॅटोंस सुटकेचा नि:श्वास टाकत म्हणाले. या घटनेनंतरही सॅटोंस लोपेझ आणि आंद्रीना या नवरा बायकोचं भारतावरचं प्रेम यानंतरही कायम आहे. आपण दोघंही परत भारतात येणारच, असं त्यांनी सांगितलं आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2008 11:15 AM IST

ताज्या बातम्या