News18 Lokmat

राजीनामा देण्यास आबांचा नकार

30 नोव्हेंबर, मुंबईमुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत. केंद्रीय गृहमंत्रीपदाचा राजीनामा शिवराज पाटील यांनी दिल्यानंतर महाराष्ट्रातही गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, राजीनामा देण्यास आबांनी नकार दिला आहे. यात राज्य सरकारची कोणतीही चूक नसल्याचं गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी स्पष्ट केलं. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी ' आयबीएन लोकमत ' शी बोलताना आर.आर. पाटील यांच्यासह टीकेची झोड उठवली.' कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा प्रश्न आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ला आतापर्यंतचा सर्वात मोठा आहे. हे सरकार लोकांच्या मालमत्तेचं आणि प्राणांचं संरक्षण करू शकत नाही. मोठमोठ्या शहरात अशा किरकोळ घटना घडतच असतात, हे गृहमंत्र्यांचं वक्तव्य बेजबाबदार आहे. त्यांनी राजीनामा नव्हे तर पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे' , असं मुंडे म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अरुण गुजराथी यांनी आर.आर. पाटील यांनी राजीनामा देणं योग्य होणार नाही, असं म्हटलं आहे. ' दहशतवादी हल्ल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत शिवराज पाटील यांनी राजीनामा दिला आहे. हा हल्ला बाहेरुन झाला आहे. त्यामुळे केंद्रांची ही प्राथमिक जबाबदारी आहे. नंतर राज्य सरकारची जबाबदारी आहे. एकट्या व्यक्तीला जबाबदार धरता येणार नाही.', असं गुजराथी म्हणाले.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Nov 30, 2008 09:43 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2008 09:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...