काळ आला होता... - एटीएस स्क्वॉड मेम्बर अरुण जाधव

30 नोव्हेंबर, मुंबई -" तेव्हा काळा आला होता, पण माझी वेळ आली नव्हती. माझ्या बरोबरचे 5 पोलीस आणि एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर आणि अशोक कामठे यांचं मरण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे...." हे शब्द आहेत एटीएस स्क्वॉड मेम्बरची अरुण जाधव यांचे. एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, एन्काउण्टर स्पेशालिस्ट विजय साळसकर आणि कामठे यांच्याच गाडीत असलेले एटीएस स्क्वॉड मेंबर अरुण जाधव सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत. करकरे, साळसकर, कामठे यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या तेव्हा जाधव यांच्या हातावर गोळी लागलेली होती. त्यामुळे ते स्टेनगन उचलू शकले नाहीत. दहशतवाद्यांना वाटलं की जाधव यांचा मृत्यू झालाय. पण करकरे, साळसकर यांच्यावरच्या हल्याचा एकमेव प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून जाधव मागे उरले आहेत. " करकरे साहेब, साळसकर साहेब आणि कामठे साहेब दहशतवाद्यांवर हल्ला कसा करायचा याची आखणी करण्यासाठी एकत्र आले होते. आमची पोलीस व्हॅन कामाकडून निघाली. मी स्वत: ड्रायव्हिंग करत होतो. पण त्यावेळी साळसकरांनी ते स्वत: ड्रायव्हिंग करत असल्याचं म्हणाले. मी मागे बसलो. तेवढ्यात झाडात लपलेले आतंकवादी अचानक समोर आले. त्यांनी आमच्या जीपवर बेछूट गोळीबार केला. त्यांना आमची गाडी हवी होती. आम्हाला मारून त्यांनी आम्हा सगळ्यांना गाडीतून फेकून दिलं. आमची गाडी घेऊन ते पसार झाले. ही घटना मी वायलेसवरून आमच्या ऑफिसमध्ये ही घटना सांगितली. आमच्यावर गोळीबार करणा-यांना नंतर आमच्या सहका-यांनी कंठस्नान घातलं... हा वृत्तांत ऐकताना अरुण जाधव जाधव यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. या जिगरबाज एटीएस स्क्वॉड मेम्बरची दहशतवाद्यांची लढाई करायची जिद्द अजूनही कायम आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Nov 30, 2008 06:08 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2008 06:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...