IBN लोकमत इम्पॅक्ट : वाघ कुटुंबीयांना मिळाला वर्षभराचा आसरा

IBN लोकमत इम्पॅक्ट : वाघ कुटुंबीयांना मिळाला वर्षभराचा आसरा

28 ऑगस्टअखेर सुवर्णा वाघ यांना स्वारगेटमधल्या त्यांच्या राहत्या क्वार्टरमध्ये राहण्यासाठी वर्षभराची मुदतवाढ दिली आहे. सुवर्णा वाघ यांच्या पतीचे पोलीस दलात असताना आजारामुळे दुदैर्वी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना पोलीस वसाहतीतील घर सोडण्यासाठी पोलिसांकडून तगादा लावण्यात येत होता. अनुकंपावर घेईपर्यंत आपल्याला घराबाहेर काढू नये अशी विनंती त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली होती. त्यांची घरासाठी होत असलेली परवड आयबीएन लोकमतने दाखवली होती. त्याची दखल घेत गृहमंत्र्यांनी त्यांना कॉर्टरमध्ये राहण्यासाठी वर्षभरासाठी मुदतवाढ दिली आहे. 11 ऑगस्टची दंगलीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पोलिसांच्या समस्या ऐरणीवर आल्या आहेत. आयुष्यभर लोकांसाठी खस्ता खाणार्‍या पोलिसांचा दुदैर्वानं मृत्यु झाला तर कुटुंबीयांच्या वाट्याला येते ती परवड..असाच अनुभव पुण्यातीलं वाघ कुटुंबीय घेतं आहे. काविळीनं नवर्‍याचा मृत्यू झाल्यानंतर आता पोलिस लाईनीतलं घर रिकामं करावं यासाठी त्यांच्याकडं तगादा लावला जातोय. हातात पैसे नाहीत. त्यामुळे दोन लहानग्या मुलांना घेऊन जायचं तरी कुठं असा प्रश्न त्यांना सतावत होता. पुण्यातल्या स्वारगेट मधल्या पोलीस वसाहतीत दोन खोल्याचं घरात सुवर्णा वाघ राहतात. वडिलांच्या पाठोपाठ त्यांचा एकुलता एक मुलगा असलेले सुनिल वाघही पोलिसात भरती झाले. नवरा बायको आणि दोन लहानगी मुलं असं सुखी कुटुंब स्वारगेटच्या पोलीस वसाहतीमध्ये सुखानं रहात होती. पण दुदैर्वाने 23 जुनला सुनिल वाघ यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांना पोलिसांकडून घर सोडण्याची नोटीस आली. पोलीस दलात अनुकंपा तत्वावर नोकरी करण्यासाठी सुवर्णा वाघ यांनी अर्ज केलाय. पण बारावी पास झाल्याशिवाय त्यांना ही नोकरी मिळू शकत नाही.. त्यामुळे बारावीची परीक्षा होईपर्यंत वर्षभर तरी या घरामध्ये राहु द्या अशी विनंती त्यांनी केली होती. आयबीएन लोकमतने सुवर्णा यांची व्यथा मांडली. गृहमंत्र्यांनी तातडीने दखल घेत अखेर त्यांना वर्षभर राहण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. पण पतीच्या निधनानंतर जो काही हाल सहन करावा लागला याची भरपाई कशी दिली जाणार हाच मोठा प्रश्न आहे.

  • Share this:

28 ऑगस्ट

अखेर सुवर्णा वाघ यांना स्वारगेटमधल्या त्यांच्या राहत्या क्वार्टरमध्ये राहण्यासाठी वर्षभराची मुदतवाढ दिली आहे. सुवर्णा वाघ यांच्या पतीचे पोलीस दलात असताना आजारामुळे दुदैर्वी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना पोलीस वसाहतीतील घर सोडण्यासाठी पोलिसांकडून तगादा लावण्यात येत होता. अनुकंपावर घेईपर्यंत आपल्याला घराबाहेर काढू नये अशी विनंती त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली होती. त्यांची घरासाठी होत असलेली परवड आयबीएन लोकमतने दाखवली होती. त्याची दखल घेत गृहमंत्र्यांनी त्यांना कॉर्टरमध्ये राहण्यासाठी वर्षभरासाठी मुदतवाढ दिली आहे.

11 ऑगस्टची दंगलीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पोलिसांच्या समस्या ऐरणीवर आल्या आहेत. आयुष्यभर लोकांसाठी खस्ता खाणार्‍या पोलिसांचा दुदैर्वानं मृत्यु झाला तर कुटुंबीयांच्या वाट्याला येते ती परवड..असाच अनुभव पुण्यातीलं वाघ कुटुंबीय घेतं आहे. काविळीनं नवर्‍याचा मृत्यू झाल्यानंतर आता पोलिस लाईनीतलं घर रिकामं करावं यासाठी त्यांच्याकडं तगादा लावला जातोय. हातात पैसे नाहीत. त्यामुळे दोन लहानग्या मुलांना घेऊन जायचं तरी कुठं असा प्रश्न त्यांना सतावत होता.

पुण्यातल्या स्वारगेट मधल्या पोलीस वसाहतीत दोन खोल्याचं घरात सुवर्णा वाघ राहतात. वडिलांच्या पाठोपाठ त्यांचा एकुलता एक मुलगा असलेले सुनिल वाघही पोलिसात भरती झाले. नवरा बायको आणि दोन लहानगी मुलं असं सुखी कुटुंब स्वारगेटच्या पोलीस वसाहतीमध्ये सुखानं रहात होती. पण दुदैर्वाने 23 जुनला सुनिल वाघ यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांना पोलिसांकडून घर सोडण्याची नोटीस आली. पोलीस दलात अनुकंपा तत्वावर नोकरी करण्यासाठी सुवर्णा वाघ यांनी अर्ज केलाय.

पण बारावी पास झाल्याशिवाय त्यांना ही नोकरी मिळू शकत नाही.. त्यामुळे बारावीची परीक्षा होईपर्यंत वर्षभर तरी या घरामध्ये राहु द्या अशी विनंती त्यांनी केली होती. आयबीएन लोकमतने सुवर्णा यांची व्यथा मांडली. गृहमंत्र्यांनी तातडीने दखल घेत अखेर त्यांना वर्षभर राहण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. पण पतीच्या निधनानंतर जो काही हाल सहन करावा लागला याची भरपाई कशी दिली जाणार हाच मोठा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2012 04:39 PM IST

ताज्या बातम्या