देसी गर्ल प्रियांकाशी घटस्फोट घेणं निकला पडू शकतं एवढं महाग

देसी गर्ल प्रियांकाशी घटस्फोट घेणं निकला पडू शकतं एवढं महाग

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस यांच्याही कुटुंबीयांनी त्यांच्या घटस्फोटाचं वृत्त फेटाळून लावलं आहे.

  • Share this:

मुंबई, 1 एप्रिल : बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस यांच्या घटस्फोटाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र आता दोन्ही कुटुंबीयांनी प्रियांका आणि निकमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचं सांगत त्यांच्या घटस्फोटाचं वृत्त फेटाळून लावलं आहे. अमेरिकेतील 'ओके' या मासिकानं निक आणि प्रियांकाच्या घटस्फोटाचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. यानंतर प्रियांका-निकच्या नात्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या मासिकानं आपल्या वृत्तामध्ये निक आणि प्रियांकामध्ये प्रचंड वाद असून हे दोघंही एकमेकांपासून विभक्त होण्याच्या विचारात असल्याचं म्हटलं होतं.

निक आणि प्रियांकाच्या कुटुंबीयांनी घटस्फोटाचं वृत्त खोटं असल्याचं सांगितलं असलं तरी खरंच निक आणि प्रियांकाला घटस्फोट घ्यायचा झाला तर ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. कारण निक आणि प्रियांकानं मॅरेज सर्टिफिकेट अमेरिकेत सादर केले आहे. यामुळे त्यांच्या लग्नाला अमेरिकन कायदे लागू होतात. आणि या कायद्यानुसार निक आणि प्रियांका एकमेकांपासून वेगळे झाल्यास त्यांना आपल्या संपत्तीची वाटणी अमेरिकन कायद्यानुसार करावी लागणार आहे. यानुसार असं म्हटलं जात आहे की, या दोघांचा घटस्फोट झाल्यास दोघांनाही आर्थिक फटका बसू शकतो कारण निकचं वार्षिक आर्थिक उत्पन्न 170 कोटी रुपये आणि प्रियांकाचं वार्षिक आर्थिक उत्पन्न 200 कोटी रुपये एवढं आहे. त्यामुळे घटस्फोट घेणं निक आणि प्रियांका दोघांनाही महागात पडू शकतं.

लग्नाच्या तीन महिने आधी निक आणि प्रियांकानं आपल्या लग्नाचं लायसन्स घेतलं होतं. त्यामुळे त्यांनी आता घटस्फोट घेतला तर त्यांना आर्थिक नुकसानही सहन करावा लागणार. अमेरिकन कायद्यानुसार घटस्फोटाच्या वेळी सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तीला कमी कमाई करणाऱ्या जोडीदाराला पोटगी द्यावी लागते. ही पोटगीची रक्कम न्यायालयाद्वारे ठरवली जाते. तसेच रक्कम ठरवताना लग्न किती दिवस टिकलं तसेच दोघांवर असलेलं कर्ज या गोष्टीदेखील विचारात घेतल्या जातात. अमेरिकेत जेव्हा सेलिब्रिटी जोड्या लग्न करतात तेव्हा ते एक Prenuptial काँट्रॅक्टवर सही करतात. ज्यात या दोघांनी घटस्फोट घेतल्यास ते दोघं एकमेकांना आपल्या संपत्तीमधील किती भाग देणार हे आधीच ठरवलं जातं आणि मीडिया रिपोर्टनुसार प्रियांका आणि निकनं अशा काँट्रॅक्टवर सही केलेली आहे.

निक-प्रियांकानं असं काँट्रॅक्ट केलेलं असो किंवा नसो पण सध्या तरी या दोघांचा घटस्फोट होईल, अशी कोणतीही शक्यता नाही. तसेच नुकतंच प्रियांकानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोवरुन तरी हे दोघंही त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी असल्याचं दिसून येत आहे.

First published: April 1, 2019, 6:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading