Elec-widget

नरोडा पाटिया दंगल प्रकरणी माया कोडनानी,बाबू बजरंगी दोषी

नरोडा पाटिया दंगल प्रकरणी माया कोडनानी,बाबू बजरंगी दोषी

29 ऑगस्टदहशतवादी कसाबच्या शिक्षेच्या निर्णयासोबतच आज अहमदाबादमध्ये एका महत्त्वाच्या खटल्याचा निकाल लागला. गुजरातमधल्या नरोडा पाटिया दंगलीप्रकरणी कोर्टाने भाजपच्या आमदार आणि माजी मंत्री माया कोडनानी आणि बजरंग दलाचा बाबू बजरंगी यांना दोषी ठरवलंय. इतरही 32 जणांना दोषी ठरवण्यात आलंय. या प्रकरणात दोषींना उद्या शिक्षा सुनावण्यात येईल. पण गुजरात दंगलीप्रकरणी दोषी आढळलेल्या माया कोडनानी या पहिल्या भाजप नेत्या आहेत, त्यामुळे गुजरात भाजपसाठी हा धक्कादायक निकाल आहे. गुजरातमधल्या नरोडा पाटियामध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी तब्बल दशकभरानंतर कोर्टाचा निकाल आला. या प्रकरणी भाजपच्या आमदार आणि माजी मंत्री माया कोडनानी यांना कोर्टाने खून आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपांखाली दोषी ठरवलंय. 2002 च्या दंगलीत दोषी सिद्ध होणार्‍या कोडनानी या भाजपच्या सर्वात ज्येष्ठ नेत्या आहेत.कोडनानींव्यतिरिक्त इतर 32 जणांना अहमदाबादमधल्या कोर्टानं दोषी ठरवलंय. त्यात बजरंग दलाचा बाबू बजरंगी याचाही समावेश आहे. गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या जातीय दंगलींमध्ये नरोडा पाटीयामध्ये उसळलेली दंगल सर्वात मोठी होती. पण न्यायाचा मार्ग सोपा नव्हता. गुजरात पोलिसांनी तर आपल्या एफआयआरमध्ये माया कोडनानी यांचं नावही घेतलं नव्हतं. सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या एसआयटीनं तपास हाती घेतल्यानंतरच कोडनानी यांना अटक झाली.गोध्रा कांडानंतर उसळलेल्या आठ दंगलींपैकी पाच दंगलीमध्ये ट्रायल कोर्टानं निकाल दिलाय. यापूर्वीच्या चार दंगलींमधल्या दोषींना कोर्टानं जन्मठेप सुनावलीय. नरोडा पाटीयाच्या कोर्टाच्या निकालामुळे पीडितांमध्येही न्याय मिळाल्याची भावना आहे. राजकीयदृष्ट्या या निर्णयाचा नरेंद्र मोदींवर फार परिणाम होणार नाही. पण 2002च्या दंगलीमध्ये भाजपच्या नेत्यांनी लोकांना चिथावणी दिली नाही, असा दावा करणार्‍यांना मात्र या निर्णयामुळे चपराक बसली आहे. कोण आहेत आमदार माया कोडनानी ?- मोदी सरकारमध्ये महिला आणि बालविकास विभागाच्या माजी राज्यमंत्री- नरोडा पाटिया दंगलीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर राजीनामा- कोडनानींचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते- कोडनानी या संघाच्या राष्ट्रीय सेविका समितीच्या कार्यकर्त्या- अहमदाबाद महापालिकेत नगरसेविकाही होत्या- 1998-2000 दरम्यान गुजरात भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा- विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 1 लाख 80 हजार मतांनी विजय- कोडनानी या मोदी सरकारमधल्या पहिल्या सिंधी नेत्या कोण आहे बाबू बजरंगी?- बजरंग दलाच्या गुजरात शाखेचा नेता- 2002च्या गुजरात दंगलीत अल्पसंख्याक समाजावरच्या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका- छुप्या कॅमेर्‍यात कैद झालेल्या संभाषणात अनेक प्रक्षोभक विधानं केली

  • Share this:

29 ऑगस्ट

दहशतवादी कसाबच्या शिक्षेच्या निर्णयासोबतच आज अहमदाबादमध्ये एका महत्त्वाच्या खटल्याचा निकाल लागला. गुजरातमधल्या नरोडा पाटिया दंगलीप्रकरणी कोर्टाने भाजपच्या आमदार आणि माजी मंत्री माया कोडनानी आणि बजरंग दलाचा बाबू बजरंगी यांना दोषी ठरवलंय. इतरही 32 जणांना दोषी ठरवण्यात आलंय. या प्रकरणात दोषींना उद्या शिक्षा सुनावण्यात येईल. पण गुजरात दंगलीप्रकरणी दोषी आढळलेल्या माया कोडनानी या पहिल्या भाजप नेत्या आहेत, त्यामुळे गुजरात भाजपसाठी हा धक्कादायक निकाल आहे.

गुजरातमधल्या नरोडा पाटियामध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी तब्बल दशकभरानंतर कोर्टाचा निकाल आला. या प्रकरणी भाजपच्या आमदार आणि माजी मंत्री माया कोडनानी यांना कोर्टाने खून आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपांखाली दोषी ठरवलंय. 2002 च्या दंगलीत दोषी सिद्ध होणार्‍या कोडनानी या भाजपच्या सर्वात ज्येष्ठ नेत्या आहेत.कोडनानींव्यतिरिक्त इतर 32 जणांना अहमदाबादमधल्या कोर्टानं दोषी ठरवलंय. त्यात बजरंग दलाचा बाबू बजरंगी याचाही समावेश आहे. गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या जातीय दंगलींमध्ये नरोडा पाटीयामध्ये उसळलेली दंगल सर्वात मोठी होती. पण न्यायाचा मार्ग सोपा नव्हता. गुजरात पोलिसांनी तर आपल्या एफआयआरमध्ये माया कोडनानी यांचं नावही घेतलं नव्हतं. सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या एसआयटीनं तपास हाती घेतल्यानंतरच कोडनानी यांना अटक झाली.

गोध्रा कांडानंतर उसळलेल्या आठ दंगलींपैकी पाच दंगलीमध्ये ट्रायल कोर्टानं निकाल दिलाय. यापूर्वीच्या चार दंगलींमधल्या दोषींना कोर्टानं जन्मठेप सुनावलीय. नरोडा पाटीयाच्या कोर्टाच्या निकालामुळे पीडितांमध्येही न्याय मिळाल्याची भावना आहे.

राजकीयदृष्ट्या या निर्णयाचा नरेंद्र मोदींवर फार परिणाम होणार नाही. पण 2002च्या दंगलीमध्ये भाजपच्या नेत्यांनी लोकांना चिथावणी दिली नाही, असा दावा करणार्‍यांना मात्र या निर्णयामुळे चपराक बसली आहे.

कोण आहेत आमदार माया कोडनानी ?

- मोदी सरकारमध्ये महिला आणि बालविकास विभागाच्या माजी राज्यमंत्री- नरोडा पाटिया दंगलीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर राजीनामा- कोडनानींचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते- कोडनानी या संघाच्या राष्ट्रीय सेविका समितीच्या कार्यकर्त्या- अहमदाबाद महापालिकेत नगरसेविकाही होत्या- 1998-2000 दरम्यान गुजरात भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा- विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 1 लाख 80 हजार मतांनी विजय- कोडनानी या मोदी सरकारमधल्या पहिल्या सिंधी नेत्या कोण आहे बाबू बजरंगी?

- बजरंग दलाच्या गुजरात शाखेचा नेता- 2002च्या गुजरात दंगलीत अल्पसंख्याक समाजावरच्या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका- छुप्या कॅमेर्‍यात कैद झालेल्या संभाषणात अनेक प्रक्षोभक विधानं केली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2012 09:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...