हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात-आर.आर पाटील

28 नोव्हेंबर मुंबईमुंबई हल्ल्यागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांनी केला आहे. आयबीएन लोकमतशी बोलताना ते म्हणाले, गेले48 तास फार तणावाचे होते. कारण अतिरेकी जिथे लपले होते. तिथे आणि त्याच्या आजूबाजूला लोक वस्ती आहे. निरपराध लोकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये यांची काळजी घेतली गेली होती. या हल्ल्यात पोलीस दलाची मोठी हानी झाली आहे. या कारवाईत 17 पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यांनी केंद्र सरकारचे यावेळी आभार मानले. कारण केंद्रीय गृहमंत्र्यांनी वेळीच लष्कर, एनएसजीचे 200 कमांडो पाठवल्यामुळे कारवाईला गती मिळाली. एनएसजीने आपलं काम अत्यंत उत्तम प्रकारे केलं आहे. पोलिसांनी पकडलेल्या अतिरेक्याकडून बरीच माहिती मिळाली आहे. हे अतिरेकी पाकिस्तानातून आले आहेत. त्याच्याकडील अत्याधुनिक शस्त्र, दारूगोळा पाहता या योजनेमागे मोठी संघटना असावी. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईवर हल्ले करून भारताला दुबळं करणं ही त्या मागची रणनीती असते. त्यामुळे आता एनएसजी सारखं संघटन त्याच्या सारखं प्रशिक्षण पोलिसांनाही मिळावं असा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यादृष्टीने लवकारात लवकर पावलं उचलली जातील.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Nov 28, 2008 12:54 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2008 12:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close