परवानगी नसली तरी मोर्चा काढणारच-राज

परवानगी नसली तरी मोर्चा काढणारच-राज

20 ऑगस्ट11 ऑगस्टला रझा अकादमीला मोर्च्यासाठी परवानगी देण्यात आली पण आम्हाला उद्या मोर्चा काढायचा आहे तर पोलिसांकडून अटकाव केला जात आहे. जर पोलिसांना हे करायचे होते तर त्या दिवशी काय केलं ? या मोर्चाबद्दल मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाली त्यांनी ही होकार दिला तरी सुध्दा जर पोलीस मोर्चा अडवणार असतील तर त्यानंतर काय होईल याला प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. विशेष म्हणजे पोलिसांनी कायदा सुव्यवस्था लक्षात घेता मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तरी सुध्दा उद्या मोर्चा काढणारच असा निर्धार राज यांनी केला. मुंबईत सीएसटी परिसरात 11 ऑगस्टला झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात गृहमंत्री आर.आर.पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी उद्या मंगळवारी मनसेच्या वतीने गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मोर्चा काढण्यात येणार आहे. आज मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्था लक्षात घेता मोर्चाला परवानगी नाकारली आहे. सायलन्स झोनमध्ये मोर्चा नको अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. मात्र राज ठाकरे यांनी पोलिसांच्या निर्णय डावलून मोर्चा काढणारच असं आव्हान दिलं आहे. राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद घेऊन थेट राज्यसरकारला आव्हान दिलंय. उद्या मोर्चा निघणार आहे म्हणून राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत येत आहे. पण, त्यांच्या गाड्या मुंबईबाहेरच अडवण्यात येत आहे. वाहतुकीला अटकाव होतोय असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मग एवढं सगळं करायचं होतं तर मग त्यादिवशी यांनी हे का नाही केलं ?, त्यांना याबद्दल पुर्व कल्पना होतीच मग माझ्या मोर्चाला परवानगी का म्हणून नाकारतात. हायकोर्टाच्या निर्णयानुसार गिरगाव चौपाटीवर गॅदरींग होता कामा नये असं सांगण्यात आलं आहे आम्ही सुध्दा तिथे कोणतीही भाषण करणार नाही, फक्त आम्ही तिथे जमणार आणि आझाद मैदानाकडे निघणार आहोत. हा मोर्चा शांतीपुर्ण मार्गाने असणार आहे. याबद्दल शुक्रवारी मी मुख्यमंत्र्यांना फोन करुन बोललो. त्यांनीही मोर्चा काढण्याचा अधिकार आहे असं सांगितलं. मग ही कारवाई कशाला जर पोलिसांनी उद्या जर काही ऍक्शन घेतले तर त्याचे रिऍक्शन जे काही होतील त्याला प्रशासन जबाबदार असेल असा इशारा राज यांनी दिला. तसेच मोर्चा मागे कोणताही राजकीय हेतू नाही शहरात जी काही बॅनर लागली आहे त्यावर मनसेचं चिन्ह नाही. काँग्रेसचा सागरगोटा माणिकराव ठाकरे टीका करतात मग जेव्हा कंट्रोलमध्ये होतं तेव्हा कुठे गेले होते असा संतप्त सवाल राज यांनी उपस्थित केला.

  • Share this:

20 ऑगस्ट

11 ऑगस्टला रझा अकादमीला मोर्च्यासाठी परवानगी देण्यात आली पण आम्हाला उद्या मोर्चा काढायचा आहे तर पोलिसांकडून अटकाव केला जात आहे. जर पोलिसांना हे करायचे होते तर त्या दिवशी काय केलं ? या मोर्चाबद्दल मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाली त्यांनी ही होकार दिला तरी सुध्दा जर पोलीस मोर्चा अडवणार असतील तर त्यानंतर काय होईल याला प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. विशेष म्हणजे पोलिसांनी कायदा सुव्यवस्था लक्षात घेता मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तरी सुध्दा उद्या मोर्चा काढणारच असा निर्धार राज यांनी केला. मुंबईत सीएसटी परिसरात 11 ऑगस्टला झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात गृहमंत्री आर.आर.पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी उद्या मंगळवारी मनसेच्या वतीने गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मोर्चा काढण्यात येणार आहे. आज मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्था लक्षात घेता मोर्चाला परवानगी नाकारली आहे. सायलन्स झोनमध्ये मोर्चा नको अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. मात्र राज ठाकरे यांनी पोलिसांच्या निर्णय डावलून मोर्चा काढणारच असं आव्हान दिलं आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद घेऊन थेट राज्यसरकारला आव्हान दिलंय. उद्या मोर्चा निघणार आहे म्हणून राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत येत आहे. पण, त्यांच्या गाड्या मुंबईबाहेरच अडवण्यात येत आहे. वाहतुकीला अटकाव होतोय असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मग एवढं सगळं करायचं होतं तर मग त्यादिवशी यांनी हे का नाही केलं ?, त्यांना याबद्दल पुर्व कल्पना होतीच मग माझ्या मोर्चाला परवानगी का म्हणून नाकारतात.

हायकोर्टाच्या निर्णयानुसार गिरगाव चौपाटीवर गॅदरींग होता कामा नये असं सांगण्यात आलं आहे आम्ही सुध्दा तिथे कोणतीही भाषण करणार नाही, फक्त आम्ही तिथे जमणार आणि आझाद मैदानाकडे निघणार आहोत. हा मोर्चा शांतीपुर्ण मार्गाने असणार आहे. याबद्दल शुक्रवारी मी मुख्यमंत्र्यांना फोन करुन बोललो. त्यांनीही मोर्चा काढण्याचा अधिकार आहे असं सांगितलं. मग ही कारवाई कशाला जर पोलिसांनी उद्या जर काही ऍक्शन घेतले तर त्याचे रिऍक्शन जे काही होतील त्याला प्रशासन जबाबदार असेल असा इशारा राज यांनी दिला. तसेच मोर्चा मागे कोणताही राजकीय हेतू नाही शहरात जी काही बॅनर लागली आहे त्यावर मनसेचं चिन्ह नाही. काँग्रेसचा सागरगोटा माणिकराव ठाकरे टीका करतात मग जेव्हा कंट्रोलमध्ये होतं तेव्हा कुठे गेले होते असा संतप्त सवाल राज यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2012 01:01 PM IST

ताज्या बातम्या