अफवा पसरवणार्‍या 245 साईट ब्लॉक;फेसबुक,ट्विटरची मुजोरी

अफवा पसरवणार्‍या 245 साईट ब्लॉक;फेसबुक,ट्विटरची मुजोरी

20 ऑगस्टआसाम दंगल प्रकरणावरुन देशभरात अफवा पसरवणार्‍या वेबसाईटवर कारवाई करण्यात आली आहे. देशात अंशातता माजवणारा मजकूर असलेल्या 245 वेबसाईट्सवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. या सर्व वेबसाईट्स ब्लॉक करण्यात आल्या आहे. यामध्ये आघाडीचे असलेल्या फेसबुक आणि ट्विटरला सरकारने अशा मजकूरांना बंदी घालावी अशी मागणी केली होती. पण ट्विटरने सरकारच्या विनंतीला प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे ट्विटरची साईट ब्लॉक झालेली नाही. तर गुगल, फेसबुकनंही आंतरराष्ट्रीय नियमांचे कारण देत सहकार्य करण्यास नकार दिला आहे. तसेच अफवा पसरवणारे एसएमएस नेमके कोणी दिले याची माहितीही गुगल आणि फेसबुक देत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, काही प्रक्षोभक फोटो हे पाकिस्तानात तयार करण्यात आल्याचं तापासून पुढे आल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सवर बंदी घालण्याची सरकारची इच्छा नाही. पण द्वेषपूर्ण मजकूर पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई करू अशी माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री सचिन पायलट यांनी म्हटलंय.

  • Share this:

20 ऑगस्ट

आसाम दंगल प्रकरणावरुन देशभरात अफवा पसरवणार्‍या वेबसाईटवर कारवाई करण्यात आली आहे. देशात अंशातता माजवणारा मजकूर असलेल्या 245 वेबसाईट्सवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. या सर्व वेबसाईट्स ब्लॉक करण्यात आल्या आहे. यामध्ये आघाडीचे असलेल्या फेसबुक आणि ट्विटरला सरकारने अशा मजकूरांना बंदी घालावी अशी मागणी केली होती. पण ट्विटरने सरकारच्या विनंतीला प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे ट्विटरची साईट ब्लॉक झालेली नाही. तर गुगल, फेसबुकनंही आंतरराष्ट्रीय नियमांचे कारण देत सहकार्य करण्यास नकार दिला आहे. तसेच अफवा पसरवणारे एसएमएस नेमके कोणी दिले याची माहितीही गुगल आणि फेसबुक देत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, काही प्रक्षोभक फोटो हे पाकिस्तानात तयार करण्यात आल्याचं तापासून पुढे आल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सवर बंदी घालण्याची सरकारची इच्छा नाही. पण द्वेषपूर्ण मजकूर पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई करू अशी माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री सचिन पायलट यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2012 09:46 AM IST

ताज्या बातम्या