पोलिसांना मारहाण करणार्‍या तिघांना अटक

18 ऑगस्टमुंबईत सीएसटी परिसरात मागिल शनिवारी हैदोस घालणार्‍या दंगेखोराविरोधात कारवाईचा फास आवळला जात आहे. हिंसाचाराच्यावेळी पोलिसांना मारहाण करणार्‍या तिन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जे.जे पोलिसांनी ही कारवाई केली. आसाम दंगलीच्या निषेधार्थ रजा अकादमीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागले. जमावाने सीएसटी परिसरात बेस्ट बसेस, माध्यमांच्या ओबी व्हॅनची तोडफोड करुन पेटवून दिल्या होत्या. यावेळी पोलिसांनी जमावाला आवार घालण्यासाठी कारवाई केली असता. जमावाने पोलिसांना मारहाण केली. महिला कर्मचार्‍यांवर हा जमाव धावून गेला. दोन दिवसांपुर्वीच पोलिसांची रायफल हिसकावून तोडणार्‍या व्यक्तीलाही अटक करण्यात आलीय. जोगेश्वरी येथे राहणार्‍या सलीम चौकियाने असं त्याचं नाव आहे. पण या सभेचा आयोजक मौलाना अहमद रेजा अजूनही फरार आहे. तो 'मदिना तुल इल्म' या संघटनेचा प्रमुख आहे. सीएसटी हिंसाचारप्रकरणी 40 दंगलखोरांची ओळख पटली आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे ही ओळख पटवण्यात यश आलंय. सीसीटीव्हीवरून पोलिसांनी 30 मिनिटांची सीडीही तयार केली आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2012 09:48 AM IST

पोलिसांना मारहाण करणार्‍या तिघांना अटक

18 ऑगस्ट

मुंबईत सीएसटी परिसरात मागिल शनिवारी हैदोस घालणार्‍या दंगेखोराविरोधात कारवाईचा फास आवळला जात आहे. हिंसाचाराच्यावेळी पोलिसांना मारहाण करणार्‍या तिन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जे.जे पोलिसांनी ही कारवाई केली. आसाम दंगलीच्या निषेधार्थ रजा अकादमीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागले. जमावाने सीएसटी परिसरात बेस्ट बसेस, माध्यमांच्या ओबी व्हॅनची तोडफोड करुन पेटवून दिल्या होत्या. यावेळी पोलिसांनी जमावाला आवार घालण्यासाठी कारवाई केली असता. जमावाने पोलिसांना मारहाण केली. महिला कर्मचार्‍यांवर हा जमाव धावून गेला. दोन दिवसांपुर्वीच पोलिसांची रायफल हिसकावून तोडणार्‍या व्यक्तीलाही अटक करण्यात आलीय. जोगेश्वरी येथे राहणार्‍या सलीम चौकियाने असं त्याचं नाव आहे. पण या सभेचा आयोजक मौलाना अहमद रेजा अजूनही फरार आहे. तो 'मदिना तुल इल्म' या संघटनेचा प्रमुख आहे. सीएसटी हिंसाचारप्रकरणी 40 दंगलखोरांची ओळख पटली आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे ही ओळख पटवण्यात यश आलंय. सीसीटीव्हीवरून पोलिसांनी 30 मिनिटांची सीडीही तयार केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2012 09:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...