इंग्लंड क्रिकेट टीमचा भारत दौरा रद्द

इंग्लंड क्रिकेट टीमचा भारत दौरा रद्द

27 नोव्हेंबर, मुंबईदरम्यान, इंग्लंड क्रिकेट टीमचा भारत दौरा रद्द झाला आहे. कटक इथं इंग्लंडची टीम आणि बीसीसीआय अधिकारी यांच्यात बैठक सुरू होती. टीमचा कॅप्टन केविन पीटरसन, कोच पीटर मुअर्स आणि टीम मॅनेजर रेज डिकासो यांनी बीसीसीआयचे सेक्रेटरी श्रीनिवासन यांनी सुमारे दोन तास चर्चा केली. या बैठकीनंतर इंग्लंडची टीम दौर्‍यातल्या उरलेल्या दोन वन डे आणि टेस्ट खेळणार नाही हे स्पष्ट झालं. मुंबईत झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर सुरक्षेच्या कारणास्तव इंग्लंड टीम व्यवस्थापनाने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. इंग्लंडची टीम गुरुवारी रात्रीच इंग्लंडला परत जाणार असल्याची बातमी आहे. चॅम्पियन्स लीग 20-20 क्रिकेट स्पर्धा तीन डिसेंबरपासून सुरु होणार आहे. पण या स्पर्धेचं भवितव्यही आता धोक्यात आलंय. बीसीसीआयच्या अधिकार्‍यांची बैठक मुंबईत सुरु आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2008 09:19 AM IST

ताज्या बातम्या