सुनील तटकरे - छगन भुजबळ घोटाळ्यात भागीदार - सोमय्या

सुनील तटकरे - छगन भुजबळ घोटाळ्यात भागीदार - सोमय्या

27 जुलैराष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची घोटाळ्यातही भागीदारी असून या दोन्ही नेत्यांच्या 3 बेनामी कंपन्या असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या दोघांनी वेगवेगळ्या कंपन्यांची नावं दिली असली तरी त्यांचे पत्ते एकच असल्याचा दावा सोमय्या यांनी केला. तसेच सुनील तटकरे यांची पुण्यातील हिंजवडी परिसरातील लाईफ स्केप्स या 500 कोटी रूपयांच्या हाऊसिंग प्रकल्पात बेनामी हिसेदारी असल्याचा आरोपही त्यांनी केला. भुजबळ आणि तटकरेंच्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईलींना दिल्याचही सोमय्यानी सांगितलं

  • Share this:

27 जुलै

राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची घोटाळ्यातही भागीदारी असून या दोन्ही नेत्यांच्या 3 बेनामी कंपन्या असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या दोघांनी वेगवेगळ्या कंपन्यांची नावं दिली असली तरी त्यांचे पत्ते एकच असल्याचा दावा सोमय्या यांनी केला. तसेच सुनील तटकरे यांची पुण्यातील हिंजवडी परिसरातील लाईफ स्केप्स या 500 कोटी रूपयांच्या हाऊसिंग प्रकल्पात बेनामी हिसेदारी असल्याचा आरोपही त्यांनी केला. भुजबळ आणि तटकरेंच्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईलींना दिल्याचही सोमय्यानी सांगितलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2012 10:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading