News18 Lokmat

एम. एफ. हुसेन यांच्या लघुपटावर बंदी

26 नोव्हेंबर, गोवामनिषा महालदारएम. एफ. हुसेन हे नांव नेहमीच वादग्रस्त आणि चर्चेत राहिलं आहे. सध्या गोव्यात सुरू असलेल्या 39व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये म्हणजे ' 'इफ्फी'त हुसेन यांच्या 'थ्रु द आइज ऑफ पेंटर ' या सिनेमाचं प्रदर्शन विरोधामुळे होऊ शकलं नाही. हिंदू राईट वींग ऑरगनाईझेशन यांच्या विरोधामुळे हा माहितीपट दाखवला गेला नाही.'थ्रु द आइज ऑफ पेंटर ' या 18 मिनिटांच्या डॉक्युमेण्ट्रीत एका राजस्थानी कलाकाराचं आयुष्य आणि वेळोवेळी त्याला आलेल्या अनुभवांचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. 1966 मध्ये हुसेन यांनी या डॉक्युमेण्ट्रीची निर्मिती केली आणि या पूर्वी अनेक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलस्‌मध्ये याचं प्रदर्शन करण्यात आलं आहे. 1967 मध्ये बर्लिनमधल्या मानाच्या गोल्डन लायन फॉर शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्येही 'थ्रु द आइज ऑफ पेंटर ' या डॉक्युमेण्ट्रीची निवड झाली होती. ' गोव्यातल्या काही संस्थांनी मुख्यमंत्री आणि इतर मुख्याधिकार्‍यांशी बोलून हुसेन यांची कलाकृती दाखवली जाऊ नये अशी मागणी केली आहे, ' अशी माहिती फिल्म फेस्टिव्हलचे संचालक एस.एम.खान यांनी दिलीये.गोव्यात हजर असलेल्या फिल्मवाल्यांनी या गोष्टीचा निषेध करत हुसेन यांची बाजू घेतली आहे. काही लोकांच्या सांगण्यावरून या संस्थेने सिनेमा दाखवायचा थांबवला गेलाय याचंच मला आश्चर्य वाटत आहे, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी व्यक्त केली आहे. ' फिल्म फेस्टव्हल मध्ये उघडपणे तुम्ही कला सादर करू शकत नसाल तर हे फेस्टिव्हल बंद करा, असं म्हणत दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी निषेध केला आहे. " हुसेन कलाकार आहेत आणि कलाकाराला स्वातंत्र्य असतंच ना, " असं मत दिग्दर्शक सुभाष घईंचं आहे. हा वाद हुसेन यांच्या देशभकत्तीवरून नाही तर तो कला आणि राजकारणाचा आहे असं म्हणायला हवं. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया राजकीय वादांपासून दूर असली तरी आता पुन्हा एकदा त्यांनाच विचारावं लागेल की असं दूर राहून कला ही स्वतंत्रपणे उभी राहू शकेल का ?

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Nov 26, 2008 01:49 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2008 01:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...